शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल जाहीर: महायुतीची लाडकी बहीण जिंकली; आदिती तटकरेंचा विजय निश्चित
2
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
3
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
4
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
8
Vikhroli Vidhan Sabha Election Result 2024 Live : विक्रोळीत पुन्हा एकदा राऊतांचीच हवा, हॅटट्रिक साधणार?; ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर
9
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल
11
Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...
12
Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट...
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
14
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
15
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
16
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर
17
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
18
Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर

टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून तो भागवतो उपजीविका; कलेला गवसली दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 11:49 PM

लॉकडाऊनमध्ये शोधला वेगळा मार्ग

प्रतीक ठाकूर 

विरार : तसा तो फिल्म इंड्रस्टीवाला रंगभूषाकार, पण कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका त्यालाही बसला. घर कसे चालवायचे हा प्रश्न त्याच्यापुढेही उभा ठाकला होता, परंतु यातून हार न मानता त्याने उपजीविकेचा वेगळा मार्ग शोधला असून त्याला जवळचे मित्र आणि समाजातील इतर लोकांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. रुपेश प्रकाश पंडित या तरुणाने आपल्यातील आत्मविश्वास आणि प्रतिभेने तरुणांपुढे वेगळा आदर्श उभा केला आहे. त्याने चक्क टाकाऊ वस्तूतून टिकावू वस्तू तयार करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गेले ३ ते ४ महिने लॉकडाऊनच्या काळात घरीच बसून राहावे लागल्याने अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत घरगृहस्थी कशी चालवावी, हा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. मात्र म्हणतात ना, आपल्या नकारात्मक विचारांनी आपण संकटात सापडतो आणि आपली सकारात्मक बुद्धी आपल्याला मार्ग दाखवते, असेच रुपेशबाबत घडले आहे.

रूपेश म्हणाला की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून रंगभूषाकाराचे काम करतोय. गेल्या ३ महिन्यांपासून काम बंद आणि पुढचे अजून किती महिने काम चालू होईल याची काही कल्पना नाही. लॉकडाऊनच्या काळात खूप लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे-मोठे उद्योग सुरू केले.

घरात आपल्या आठवणीसाठी जपून ठेवलेल्या जुन्या वस्तू कोणी फेकून दिल्या असतील, तर कोणी आठवण म्हणून ठेवून दिल्या असतील. तर त्या वस्तूंना एक नवीन रूप देण्याचे काम सध्या रुपेश करत आहे. त्याची सुरुवात त्याने आपल्या घरातूनच केली. यासाठी त्याने घरातील जुन्या बाटल्या, जुने स्टूल, मोबाईलचे बॉक्स, कुठलेही एखादे झाडाचे खोड, जुने प्लास्टिकचे डबे वगैरेतून आपल्या कलाकृती तयार केल्या आहेत. ज्या वस्तूला तुम्ही निकामी म्हणून पाहिले असेल ती एका आगळ्या-वेगळ्या रूपात तुमच्यासमोर आली तर... हेच काम सध्या रूपेश करत आहे. त्याला आता त्याचे काही मित्र आणि अन्य लोकही मदत करीत आहेत. त्यातून त्याला उपजीविकेसाठी पैसेही मिळू लागले आहेत. त्याने नैराश्य झटकून तरुणांना सकारत्मक विचार करण्यास प्रवृत्त केले असून वेगळा आदर्श ठेवला आहे.संकटावर मात करणे शक्यस्वत:मध्ये अशी काय कला आहे, ती बाहेर कशी काढायची, याचा विचार करा. तुमचे त्यात मन रमेल आणि नको ते विचारही डोक्यात येणार नाहीत. मग बाहेरच्या कोरोनाला आणि मनातल्या दडपणाच्या कोरोनासारख्या प्रत्येक संकटावर सहज मात करता येईल.- रूपेश प्रकाश पंडित

टॅग्स :artकला