शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
3
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
4
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
5
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
6
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
7
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
8
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
9
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
10
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
11
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
12
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
13
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
14
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
15
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
16
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
17
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
18
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
19
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
20
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आरोग्यकेंद्रांना अचानक भेटी, कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 5:09 AM

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्र वारी आरोग्य यंत्रणेला पूर्वसूचना न देता डहाणू तालुक्याचा दौरा करून बालमृत्यू व कुपोषणाची माहिती घेतली.

बोर्डी : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्र वारी आरोग्य यंत्रणेला पूर्वसूचना न देता डहाणू तालुक्याचा दौरा करून बालमृत्यू व कुपोषणाची माहिती घेतली. त्यानंतर विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व खेडोपाड्यात गृहभेटीद्वारे आढावा घेतला.डहाणूतील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने मंजुर करण्यात आलेल्या बालउपचार केंद्रास भेट दिली. या वेळी बालकं, त्यांचे पालक, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. शिवाय उपचार पद्धती, औषधसाठा, स्वच्छता तसेच प्रसूतीच्या संख्येत वाढ झाल्या बद्दल प्रशंसा केली. त्यानंतर सरावली उपकेंद्रातील पाटीलपाडा येथे गृहभेटीद्वारे दोन कुपोषित बालकांची विचारपूस करून आहार व औषधोपचार या बद्दल आरोग्य सेविका अशा कर्मचाºयांना सूचना दिल्या. त्याचप्रमाणे गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चारी पारसपाडा येथे बालमृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.या वेळी पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, डहाणू तालुक्याचे गटविकास अधिकारी राहुल धूम, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत चव्हाण तसेच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.अधिकारी कर्मचाºयाची उडाली तारांबळतलासरी : राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी शुक्र वारी अचानक भेट देऊन तलासरीतील कुपोषित मुलाची पाहणी केली त्यामुळे अधिकाºयाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तालुक्यातील वडवली डोंगरीपाडा येथे भेट देऊन मॅम मध्ये असलेल्या कनिष्का परशु खरपडे या बालकाच्या घरी वापरात असलेल्या झोळी बाबत निरीक्षणे नोंदवून योग्य पर्याया बाबत मार्गदर्शन व सूचना केल्या.तसेच मे मध्ये कुपोषणाने मृत्यू पावलेल्या समीर आंबोलकर या बालकाच्या घरीही जाऊन त्याच्या पालकाची विचारपूस केली व वडवली उपकेंद्राला भेट दिली व उपकेंद्रातील उपलब्ध औषध साठा व जोखमीची बालके व गरोदर मातांवरील उपचारांचा आढावा घेतला. या नंतर आमगाव आरोग्य केंद्राअंतर्गत डोंगारी विल्हातपाडा येथे कुपोषित नंदिनी खराड, अंकिता डावरे या बालकाच्या घरी भेट दिली व दत्तक बालक पालक योजने बाबत डोंगारी चे सरपंच सदाशिव खेवरा यांच्याशी चर्चा केली.या भेटीच्या वेळी आरोग्यमंत्रांसोबत आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड , राहुल धूम गटविकास अधिकारी तलासरी , डॉ अजय ठाकरे , डॉ अभिजित चव्हाण, आनंद जाधव प्रकल्प अधिकारी तलासरी इत्यादिसह कर्मचारी उपस्थित होते.