डहाणू : येथे शनिवारी घडलेल्या बोटदुर्घटनेमध्ये समुद्रात बुडणाºया २५ विद्यार्थ्यांचा जीव आपल्या प्राणाची बाजी लावून वाचविणा-या व त्यांना किना-यापर्यंत सुखरुप आणणा-या डहाणूतील ३५ मच्छीमार युवकांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते येथील प्रांत कार्यालयात करण्यात आला. यावेळी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले गेले. त्यात नंदकुमार विंदे, गणेश मर्दे, जयकिसन तामोरे, पवन गणेश धानमेहेर, साईराज पागधरे, जतीन मांगेला रा. डहाणू मंगेलवाडा, आणि भाविक दवणे, स्वप्नील विंदे, चंदन मेहेर, धनेश आकरे, गणेश पागधरे, सुधीर खाकरे संजय वेडगा, विनोद वेडगा, सत्तार , मनिष सालकर, शापूर सालकर, विजय दुबा, सलिम शेख व इतरांचा समावेश होता.पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, डहाणू नगर परिषद, रोटरी क्लब आॅफ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा शाल, पु्ष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गेला. यावेळी डहाणूवर ओढावलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करतांना डहाणूकरांनी दाखवलेली एकजुट कौतुकास पात्र असून यापुढेही आपतकालीन परिस्थितीचा सामना करतांना ते ती टिकवून ठेवतील असे गौरवोद्गार जिल्हाधिकाºयांनी काढले. यावेळी सहा. जिल्हाधिकारी आँचल गोयल, नगराध्यक्ष भरत राजपूत, तहसीलदार राहुल सारंग, मुख्याधिकारी विनोड डवले, उपस्थित होते. यावेळी ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष मर्दे यांनी या दुर्घटनेत बोटचालक आणि त्यांच्या साथीदाराने बोटीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे जीव वाचवले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांचा सहानुभूतीने विचार करावा असे आवाहन केले. स्थानिक मच्छीमार, तटरक्षक दल, डहाणू नगर परिषद, तहसिलदार, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांचे आभार मानले.
तरुणांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते हृद्य सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:41 AM