बोर्डी/कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, विक्रमगड तालुक्यांत शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला. धामणी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून सूर्या नदीत १३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील सरासरी पर्जन्यमान पातळी गाठली आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील जलस्रोत भरले आहेत. पालघर जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अखेरीस ६६ टक्के (८६८ मि.मी.) पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र आॅगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होऊन रविवारी ३० आॅगस्टपर्यंत सरासरी ११८९ मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला, मात्र संततधार कायम होती. जून ते आजतागायत १९५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टअखेर २ हजार मिलिमीटरचा टप्पा लवकरच गाठला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बोर्डीलगत असलेले अस्वाली वगळता जिल्ह्यातील धरणे भरून वाहत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे कासाजवळील धामणी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व पाचही दरवाजे रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता उघडले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. सूर्या प्रकल्पातील धामणी धरण १०० टक्के भरले आहे. धरणाची पाण्याची पातळी ११८.६० मीटर गाठली आहे, तर धरणातील पाणीसाठा २८५.३१० दशलक्ष घनमीटर इतका आहे. यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे सर्व दरवाजे ५० सेमीपर्यंत उघडले असून धरणांतून ९ हजार ६६ क्युसेक पाणी सोडले आहे, तर त्याखालील कवडास धरण हे महिनाभरापूर्वीच पूर्ण भरले आहे. त्यामुळे एकूण १३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा निसर्ग सूर्या नदीत होत असून सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. धरण पूर्ण भरल्याने पालघर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात आज ८४ मि.मी. पाऊस पडला आहे. तर आतापर्र्यंत २२९६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे.तुफान पावसामुळे विजेचे खांब पडलेजव्हार : जव्हार, मोखाडा, डहाणू तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती झाली आहे. वाºयासह पाऊस पडत असल्यामुळे डहाणूहून जव्हार-मोखाड्यात वीजपुरवठा करणाºया हायटेन्शन वायरचे ५ लोखंडी खांब डहाणू भागात पडल्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजेपासून जव्हार-मोखाडा भागाची वीज रात्री उशिरापर्यंत खंडित झाली होती.दरवर्षी पावसाळ्यात जव्हार भागात वादळी वाºयासह मुसळधार पाऊस पडत असतो. रविवारी जव्हार तालुक्यात ३३६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. वीजपुरवठा हा डहाणू - गंजाड- सूर्यानगर व सूर्यानगर ते जव्हार असा ७८ कि.मी. दुरून जव्हार मोखाडा भागात वीजपुरवठा केला जातो. वीजपुरवठा करणारी सर्व यंत्रणाही खूप जुन्या व जीर्ण झाल्या असून, थोडाही पाऊसवारा आला की, वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे येथे विजेची समस्या आजही कायम आहे.विक्रमगड : नदी-नाल्यांना पूरविक्रमगड : तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोऱ्यांवरून पाणी वाहून जाऊ लागले आहे. यामुळे अनेक गावांचा काही काळ तालुक्याशी व विक्रमगड शहराशी संपर्क तुटला होता.रविवारी सकाळी विक्रमगड-मनोर मार्गावरील पाचमाड पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि मनोर व पालघरचा संपर्क काही काळ तुटला होता तसेच विक्रमगड भागातील छोटे पूल काही वेळ पाण्याखाली गेले होते. काही काळ वाहतूक खोळंबली होती. तसेच दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते.तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे खांड लघु पाटबंधारे व मुँहू खुर्द लघु पाटबंधारे दोन दिवसाच्या सततच्या पावसाने भरायला सुरुवात झाली असून पाऊस असाच राहिला तर हे बंधारे ओव्हरफ्लो होतील. पावसाचा जोर कायम असून तालुक्यात ३० आॅगस्ट पाऊस विक्रमगड मंडळ ६५ तर तलवाडा ५५ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू, जव्हार, विक्रमगडमध्ये संततधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 1:29 AM