शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 3:23 AM

तालुक्यात गेल्या २ ते ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यात शुक्रवारी विक्रमगड येथे १०३ मी.मी. पावसाची नोंद झाली असून तलवाडा येथे १८०, मी.मी. नोंद झाली आहे

पालघर : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून आलेल्या पुरात एक जण वाहून गेला असून जव्हार मुंबई दरम्यानची वाहतूक पूल पाण्याखाली गेल्याने सात तास ठप्प होती. पर्यायी रस्ता माहित नसल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती. तर पावसाच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच पेरा वाहून गेला आहे.

विक्रमगड : तालुक्यात गेल्या २ ते ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यात शुक्रवारी विक्रमगड येथे १०३ मी.मी. पावसाची नोंद झाली असून तलवाडा येथे १८०, मी.मी. नोंद झाली आहे या दोन दिवसापासून पावसाने जोर धरल्याने नदया नाले ओसंडून वाहत आहेत. काही भागात पुर जण परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील जव्हार विकमगड येथील साखरे पूल पाण्याखाली गेल्याने काही तास वाहतूक बंद झाली होती तसेच मलवाडा येथिल नदी लगत असलेल्या काही घरांना व प्राथमिक आरोग्य केंद्राला पुराची झळ लागली या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी या भागाल भेट दिली पाणी कमी झाले तरी त्यांनी जनतेला सतर्क राहण्याची सुचना दिल्या. काल पासून पावसाने जोर पकडला आहे. या मुसळधार पावसा मुळे शेतकरी खुश असला तरी. भाताची लागवड करता येत नाही, कारण सगळी शेत पाण्याने भरली आहे.थोडेसे वेगाने वारे वाहू लागताच महावितरण विजपुरवठा खंडीत करते त्यामुळे एकाच वेळी मुसळधार पाऊस आणि अंधार अशा दुहेरी समस्येला जनतेला सामोरे जावे लागते असल्याने ती संत्रस्त झाली आहे.नाल्यांना पूर, रस्त्यांचे कालवेमनोर : दमदार पावसामुळे मनोर परिसरातील वाहणाऱ्या नद्यांना पूर आले तर रस्त्यांना कालव्याचे स्वरूप प्राप्त झाले त्यातच आठवडा बाजारासाठी आलेल्यांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. सतत पाऊस पडत असल्याने मनोर परिसरातील वाहणाºया वैतरणा, देहरजा, हाथ, सूर्या, नद्यांना पूर आलेत. नदी किनाºयावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे तसेच मनोर पालघर रस्त्यावर मनोर बसस्थानक, बाजारपेठ रस्त्यावर पाणी भरल्याने त्यांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवार आठवडा बाजार असल्याने लोकांना गुढघ्याभर पाण्यातून चालावे लागले तर वाहतूक कासवगतीने सुरू होती. तसेच विद्यार्थ्यांची शाळेपर्यंत पोहोचतांना दमछाक होत होती. त्यांचेही प्रचंड हाल झाले मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी साचले होते त्यातून मार्ग काढताना चालकांना तारे वरची कसरत करावी लागत होती.वसई तालुक्यात साचले पाणीविरार : वसई विरार मध्ये शुक्रवार पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. काल जरी थोडा वेळ ऊन पडले असले तरी आज सकाळपासून पाऊस पडत आहे. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. वसई मध्ये दोन दिवस ऊन पावसाचा खेळ दिसून येत आहे. एकीकडे पावसाच्या येण्याने ग्रामीण भागात आनंदाच वातावरण आहे तर दुसरीकडे शहरी भागात महापालिकेने नाले व्यवस्थीत साफ न केल्याने थोड्याशा पावसामुळे रस्त्यावर पाणी साचते आहे. ज्याचा त्रास वसई- विरार मधील सामान्य नागरीकांना होतो आहे. सेंट्रलपार्क, तुळींज रोड, विजय नगर, येथे तर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. गालानगर, एमडी नगर, आचोळे, सेन्ट्रलपार्क, तुळींज पोलीस ठाणे, तुळींज रोड, टाकी रोड इतर सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षा, मोटारसायकलींना त्याचा फटका बसला आहे. तर विवा कॉलेजच्या परिसरात देखील पाणी साचले आहे. जोरदार पाऊस पडला की थोड्या वेळाने ऊन असे काहीस चित्र वसई विरार मध्ये पाहायला मिळते आहे.पावसामुळे वसई तालुक्यातील भातपेरण्या जोरातवसई : जून महिन्यात उशीरा का होईना मान्सून राज्यात दाखल झाल्याने भातशेतीच्या हंगामावर परिणाम झाला. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा काहिसा चिंताग्रस्त झाला होता.मात्र आता मुसळधार पडणाºया पावसामुळे भातपेरणीला जोरदार सुरूवात झाली असली तरी ग्रामीण भागातील शेतात पाणी साचल्याने पेरण्या लांबणीवर जाणार आहेत.गेल्या पंधरा दिवसात तालुक्यात फारच कमी पेरण्या झाल्या होत्या.समाधानकारक पावसानंतर उरलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी भात रोपाची वाढ होऊन ते लावणीयोग्य होईपर्यंत शेतक-यांना आता वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे लावणी हंगामही काहिसा लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत.तानसा नदीच्या पट्टयातील वसई पूर्व सखल भागात पाणी साचल्यामुळे दरवर्षी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे तेथील शेतकरीही थोड्या उशीराने पेरण्या करीत असतात. त्यात मान्सूनने उशीरा एन्ट्री घेतल्यामुळे पेरण्या लांबतील.सखल भागात पाणी साचल्यामुळे पेरण्या वाहून गेल्या.जव्हारमध्ये दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरुजव्हार : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊसाने सूरवात केली असून, सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. नदी, नाले, झरे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गुरु वार पासून सुरु झालेला पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याने जव्हारहुन मनोर, पालघर, ठाणे मुंबईकडे जाणा-या साखरे गावाजवळचा पूल बुडाल्याने रात्रीपासून सकाळी ९ वाजेपर्यंत ७तास वाहतूक बंद होती. त्यातच नवीन पुलाचे काम चार वर्षापासून कूर्मगतीने सुरु आहे. 'त्यामुळे काही वाहन चालकांनी पर्यायी रस्ता म्हणून वाळवंडा, मेढा उज्जेनी परळी वाडा मार्गे ठाणे मुंबईकडे जावे लागले. मात्र काहींना पर्यायी रस्ता माहिती नसल्याने पुलावरील पाणी कमी होईपर्यंत वाट पहावी लागली. अजूनही पावसाची संततधारा सुरूच आहेत. जव्हार तालुक्यात १२७.५ मी.मी. पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागासह गुरु वारच्या पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला तो शनिवारी रात्रीपर्यंत सुरूच होता.वैतरणा नदीच्या पुराचे पाणी घरात घुसलेवाडा : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. वैतरणेला आलेल्या पुराचे पाणी शिरीषपाडा येथील सदानंद गोतारणे यांच्या घरात पहाटेच्या सुमारास पाणी घुसल्याने संसारपोयगी वस्तू संपूर्ण भिजल्या आहेत.तसेच फ्रीज पलंग घरात ठेवलेले खत संपूर्ण भिजून गेले आहे. येथील नजीब मुल्ला, चितांमण दळवी व सुरेश दळवी यांच्याही घरात गुडघाभर पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.राजेंद्र गावितांनी केली पाहणीबोईसर : चक्र ीवादळामुळे मुरबे गावातील घरांचे पत्रे उडून व घरांमध्ये पुराचे पाणी शिरून खूप मोठ्या प्रमाणात घरगुती सामानाचे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी तसेच गावकºयांसोबत चर्चा करण्यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी आज भेट दिली मुरबे गावातील किनाºयावरील सुमारे ६२ घरांना मंगळवारी चक्री वादळाचा तडाखा बसला होता त्याची प्रत्यक्ष पाहणी आज खासदार गावितांनी केली या वेळी भाजपा पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरे, ग्रामविकास अधिकारी जे.बी.डोहाळे, संतोष तांडेल तसेच मुरबे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार