शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

डहाणू, जव्हार येथे जोरदार अवकाळी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 1:16 AM

शेतकऱ्यांचे नुकसान, कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी

कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. नाले, ओहोळ यांना पूर आला आहे. शेते पाण्याने भरली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कापलेली पीक पाण्याखाली गेली आहेत.

तालुक्यातील कासा भागात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. तब्बल अडीच ते तीन तास ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. कासा भागातील कासा, चारोटी, वाघाडी, वेती, वरोती, तवा, पेठ, आंबेदा, नानीवली, उर्से, साये, निकावली, म्हसड, आंबिवली, महालक्ष्मी, खाणीव, सोनाळे आदी गावामध्ये शेतकऱ्यांनी कापलेल्या भाताची कडपे पाण्यावर तरंगू लागली आहेत तर काही वाहून गेली आहेत. परिणामी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले.

कासा भागात कापलेली भात पीक सहा सात दिवसापासून शेतातच आहेत. पाच दिवसात काही प्रमाणात पाऊस झाल्याने तेव्हा दाणे रुजले आहेत तर कडपे कुजायला लागली आहेत. सोमवारी दिवसभर उघाड दिल्याने शेतातील कडपे सुकण्यासाठी शेतकºयांनी पलटी केली तर काही शेतकºयांनी मंगळवारी सकाळपर्यंत भात कापणी केली. मात्र मंगळवारी दुपारी तीन वाजेनंतर पावसाने जोरदार सुरु वात केली अडीच ते तीन तास पाऊस झाला. त्यामुळे पूर आला असून शेते पाण्याने भरली आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात

मोखाडा : तालुक्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस धो-धो बरसत असल्याने हळव्या भातपिकाला नुकसानीचा फटका बसला आहे. गेल्या सात - आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीची दाणादाण उडवली आहे. दुपारनंतर आकाशात ढगाळ पावसाळी वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस पडत आहे.

पालघर जिल्ह्यात एक लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली होती. यामधील ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. यामधील २ हजार ३७ हेक्टरमध्ये भात लागवड करण्यात आली आहे. हळव्या जातीतील भात पीक कापणीसाठी तयार झाली आहेत.पावसाळा भर रुसवे फुगवे दाखवून शेतकºयांना चिंतेत टाकलेल्या पावसाने जाता जाता नागली, वरई या पिकाला काही अंशी आधार दिल्याने शेतातील पिके सावरली असून हळूहळू शेतकºयाने तयार झालेले भात पीक खळ्यावर आणण्यासाठी लगबग सुरु केली, परंतु पावसाच्या लहरीपणामुळे शेतात उभारलेले भात पीक व कापणी केलेल्या कडप्यांची नासाडी होऊन भाताचे दाणे काळे पडण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाचा फटका

जव्हार : जव्हार हा ९९ टक्के आदिवासी तालुका असून येथील खेडापाड्यातील आदिवासी बांधव शेतीवर आणि मजुरीवर अवलंबुन असतो. मात्र आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकºयांच्या पिकांवर पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.च्पावसाळा सप्टेंबर अखेर संपतो. मात्र यंदा आॅक्टोबरच्या अंतिम आठवड्यातही जोरदार पाऊस असून यामुळे येथील शेतकºयांच्या भात, नागली, वरई, उडीद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच वर्षभरात शासनाकडूनही कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळत नाही.

रोजगार नसला तरी शेतीतील पीक खाऊन जगणारा आदिवासी संकटात सापडला आहे. या पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. दरम्यान, एकीकडे शासनाकडून रोजगार नाही तर दुसरीकडे अस्मानी संकट, या कचाट्यात शेतकरी सापडला आहे.

डहाणूत भातपिकांचे नुकसान

डहाणू : डहाणू तालुक्यात चार-पाच दिवसापासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू असून शेतकºयांनी तयार भातपिकाची कापणी मोठ्या प्रमाणावर केली होती. मात्र, ती कालपासून सुरू असलेल्या पावसाने पूर्ण भिजून गेली. त्यामुळे डहाणू तालुक्यातील शेतकºयांचे करोडोचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या भात पिकाचे सरकारने पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.

काही दिवसांपासून डहाणूत वादळी वाºयासह परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे रोगांनी खाल्लेली भात पिके, शेतकºयांनी कापणी करून ती खाचरात सुकण्यासाठी टाकली होती. परंतु भात खाचरात पाणी भरल्याने भिजून त्यावर अंकुराच्या माळा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे करोडोचे नुकसान झाले आहे. चिकू बागायतदार शेतकºयांना या पावसाचा फटका बसला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी