पालघर : रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या.पालघर जिल्ह्यात २४ तासांत २३८ मि. मि. पावसाची नोंद झाली. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले. तर काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या थोड्या उशिराने धावत होत्या, तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उदयपूर - वांद्रे एक्स्प्रेस या गाडीला वलसाड स्थानकात थांबवून परत पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.वसई-विरार येथे यंदा सलग सहाव्यांदा पाणी भरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत उद्भवणाºया पूरिस्थतीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. बोळिंज, विराट नगर, विवा कॉलेज रोड, अचोले, नालासोपारा पश्चिम, एव्हरशाइन रोड इत्यादी ठिकाणी पाणी साचले होते. पहाटे झोपेत घरात पाणी शिरू लागल्याने लोकांची धावपळ झाली.>२ ते ३ हजार बोटी समुद्रातगणेशोत्सवानंतर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, एडवन, मुरबे, डहाणू आदी भागांतील २ ते ३ हजार बोटी समुद्रात रवाना झाल्या आहेत. रविवार सकाळपासून वायरलेस सेटवरून या बोटींचा संपर्क होऊ शकत नसल्याचे कव-दालदा संघर्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मेहेर यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, रस्ते वाहतूक मंदावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:42 AM