शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयात हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:21 AM

अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे.

वाडा : अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे. नुकसानीचे पंचनामेही झाले, मात्र नुकसानभरपाईबाबत शासन पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नसल्याने शेतकरी पीक विम्याची रक्कम तरी मिळावी यासाठी शासनाच्या कृषी कार्यालयात, तहसीलदार आणि कर्ज घेतलेल्या बँकेच्या अधिका-यांकडे हेलपाटे मारत असताना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील शेतकºयांचे भात हे एकमेव पीकअसून ते निसर्गावरच अवलंबून आहे. गतवर्षी येथील शेतकºयांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले होते. तर यावर्षी शेतकरी ओल्या दुष्काळात भरडला गेला आहे. नुकसानीचे पंचनामे झालेले असले तरी मदतीबाबत कुठलीच माहिती शेतकºयांना मिळत नसल्याने शेतकरी साशंक झाला आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही नाही सरकारची मदत मिळाली, नाही विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळाली. त्यामुळे यंदाही भरपाईपासून वंचित रहावे लागते की काय, अशी भीती शेतकºयांना भेडसावते आहे.वाडा तालुक्यातील ५६४७ शेतकºयांनी न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडून विमा काढला आहे. तर काही शेतकºयांनी सेवा सहकारी संस्थाकडून कर्ज घेतानाच विम्याची रक्कम भरलेली आहे. नुकसान भरपाईबाबत शासन आणि प्रशासन पातळीवर काहीच हालचाली दिसून येत नाहीत. भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी कुठले कागदपत्र, पुरावे कुठे सादर करावेत याबाबत माहिती मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत.भरपाई संदर्भात कुठल्याच शासकीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला नसल्याने शेतकरी आता नुकसान झालेल्या भातपिकाचे फोटो, जमिनीचे सातबाराचे उतारे, विमा भरल्याची पावती तसेच अन्य पुराव्याचे कागदपत्र घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवितांना दिसून येत आहेत.वाडा तालुक्यातील २१ हजार ६५० बाधित शेतकरी असून त्याचे एकूण १० हजार ३० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे ८० ते ९० टक्के नुकसान झालेले आहे. अलिकडेच (१६ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी खरीप पिकासाठी प्रती हेक्टरी आठ हजार तर फळबागासाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत, शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.ही मदत दोन हेक्टरपर्यंतच दिली जाणार आहे. राज्यपालांच्या निर्णयानुसार शेतकºयांना फक्त एकरी ३२०० रुपये नुकसानभरपाई म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हे काम आहे, अशी तिखट प्रतिक्रि या येथील शेतकरी नेते तथा कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे.वाडा तालुक्यात खरीप पिकाचा विमा घेतलेल्या शेतकºयांची संख्या जास्त असल्याने येथे विमा कंपनीचे दोन स्वतंत्र्य अधिकाºयांची नेमणूक केली आहे.-प्रवीण गवांदे, उपविभागीयकृषि अधिकारी, वाडाखरीप पिकाचा विमा काढताना आॅन लाईन सातबारा व अन्य कागदपत्र दिलेले असतानाही पुन्हा-पुन्हा वेगवेगळे कागदपत्र व नुकसानीचे पुरावे मागितले जात आहेत.- नारायण परशुराम पाटील,शेतकरी, पीक, ता.वाडा

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाpalgharपालघर