मीरा रोड : लोकप्रतिनिधी, अधिकारी वा कोणा व्यक्तीकडून त्रास देण्याचा, अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास तत्काळ मदतीसाठी महापालिकेतील शिवसेना प्रणित मीरा- भार्इंदर कामगार सेनेचे सदस्य असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांसाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे, अशी माहिती सरचिटणीस सुलतान पटेल यांनी दिली. कामगार सेनेच्या सदस्यांवर अवलंबले जाणारे दबावतंत्र मोडून काढू असा इशारा त्यांनी दिला आहे.पालिकेत शिवसेना प्रणित कामगार संघटना ही पूर्वीपासून असली तरी येथे आधी शरद व रवी राव यांच्या म्युनिसिपल लेबर युनियनचे वर्चस्व होते. राव यांच्याकडून कर्मचारी, अधिकारी यांच्या विविध प्रश्न, मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाºयांनी रयतराज संघटना आणली. परंतु येथेही कर्मचाºयांना तसाच अनुभव आला. त्यातच सत्ताधारी भाजपा नेतृत्वाने स्वत:ची श्रमिक जनरल कामगार संघटना सुरू करत पालिकेतील कर्मचाºयांच्या पतपेढीवर ताबा मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण निवडणुकीत अन्य सर्व पक्ष व संघटनांनी पालिकेतील रयतराजच्या कर्मचाºयांच्या पॅनलला जाहीर पाठींबा देत भाजपा समर्थक पॅनलचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर रयतराजच्या सदस्यांनी दबावतंत्राला प्रबळ विरोध करता यावा म्हणून शिवसेना प्रणित कामगार सेनेत प्रवेश केला.सेनेच्या सदस्यांना फोडण्याचे काम विरोधकांनी सुरूच ठेवले आहे. काही अधिकारीही दबाव टाकत असतात. यामुळे सदस्य कर्मचारी, अधिकाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
कामगार सदस्यांसाठी हेल्पलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:15 AM