वसई : सात महिन्यांची गर्भवती पत्नी पळून गेल्याने नैराश्य आलेल्या पतीने लोकलखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.अमित रतनशी पोकर (२५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो विरारमधील रहिवासी होता. मुंबईतील एका कंपनीत कामाला असलेल्या अमितचे दोन वर्षांपूर्वी धर्मिताशी लग्न झाले होते. धर्मिता सात महिन्यांची गरोदर आहे. मात्र, ९ मार्चला धर्मिता नवऱ्याचे घर सोडून पळून गेली होती. त्यामुळे अमितला नैराश्य आले होते. या नैराश्यातून अमितने काल वसई-नालासोपारादरम्यान लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ काढला आहे. त्यात पत्नी पळून गेल्याने आपण आत्महत्या करीत आहोत, असे म्हटले आहे. सुखात ठेवूनही पत्नीने धोका दिल्याने आपल्याला नैराश्य आले असून जगण्याची इच्छा राहिलेली नाही, असे अमितने म्हटले आहे. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
पत्नी पळून गेल्याने पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:33 AM