पारोळ : बुलेट ट्रेन, मल्टी मॉडेल कॅरिडोर, मुंबई बडोदा, हे प्रकल्प वसई तील शेतकरी यांच्या वर लादले जात असतानाच आता वसई पूर्व भागातीलआंबोडे, भिनार, आडणे, थळयाचापाडा, नवसई, खानिवडे या गावातून २२० के.व्ही.ची उच्चदाब वीजवाहिनी जात असल्याचेही वाहिनी शेतावरून गेल्यास शेती करण्यास धोका निर्माण होत असल्याने व प्रकल्पबाधित शेतकरी यांना विश्वासात न घेता या वाहिनीचे काम सुरू केल्याने या भागातील शेतकरी संकटात सापडला आहेत. या भागातील शेतकऱ्यांचा विरोध असताना ही या वाहिनीचे काम सुरू असल्याने सरकार आमच्या आत्महत्येची वाट बघतय का असा प्रश्न शेतकरी यांना पडला आहे.
तारापूर बोरीवली या उंचदाबवाहिनी जोडून नवीन उच्चदाब वाहिनी कुडूस (वाडा) येथे नेण्यात येणार आहे. २९ किमी च्या या वाहिनी मध्ये अनेक शेतकरी यांच्या जमिनी जात असून अष्टविनायक कन्ट्रक्शन या ठेकेदाराने हे काम घेतले असून त्यांनी या प्रकल्पातील शेतकरी यांना मोहबदल्या बाबतची कोणतीही पूर्तता काही शेतीची नासधुस करत काम सुरू करत शेतकऱ्यांची दिशाभूल केली. या वाहिनीच्या कामात अनेक शेतकरी बाधित होणार असून ही उच्चदाबाची वाहिनी शेतावरून जात असल्याचे पुढे ही शेती मध्ये लागवड करणे धोक्याचे होणार आहे. या वाहिनीचा आवाज येणार असल्याने या बाधित शेतात काम करण्यासाठी मजूर ही येणार नाहीत. अशी अडचण शेतकरी यांच्या पुढे उभी राहिली आहे. शेतकरी यांनी हे काम बंद करावे आम्ही जागा देणार नाही असे निवेदन ग्रामपंचायत आडणे व महसूल विभाग वसई यांना दिले आहे.
या उच्चदाब वाहिनीमुळे माझे तीन शेत बाधित होणार असून या शेतात काम करण्यासाठी मजूर लावणे ही धोक्याचे होणार असल्याने या प्रकल्पाला आमचा विरोध आहे.-लक्ष्मीप्रसाद पाटीलबाधित शेतकरी, आडणे