शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

लोकमतच्या जलमित्र अभियानात हाय वेवरील हॉटेल्स सहभागी

By admin | Published: June 06, 2016 1:23 AM

लोकमत जलमित्र अभियान अंतर्गत पाणी वाचविण्यासाठी महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनजागृती मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावरिल हॉटेल व्यवसायीकांनी या अभियानात रविवारी आपला

मनोर: लोकमत जलमित्र अभियान अंतर्गत पाणी वाचविण्यासाठी महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनजागृती मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावरिल हॉटेल व्यवसायीकांनी या अभियानात रविवारी आपला सहभाग दर्शविला. यावेळी लोकमतचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांनी मार्गदर्शन केले.लोकमत ने लोकांमध्ये पाणी आपण कशा पध्दतीने वाचवू शकतो याची माहिती देण्यासाठी कुमार पार्क मस्तान नाका येथे लोकमत जलमित्र अभियान आयोजित केले होते. त्यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र.२ वरील हॉटेल व्यवसायीक सहभागी झाले होते त्यांच्याबरोबर वडापाव विक्री करणारे कॅन्टीन धारकही सहभागी झाले होते. यावेळी टेणी यांनी लोकमत जलमित्र अभियानाची संकल्पना उद्देश स्पष्ट करून पाणी पिण्यासाठी छोटे ग्लास, शॉवरचा वापर न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ करणे तसेच गाडी धुण्यासाठी ड्राय क्लिनिंग तंत्राचा किंवा ब्रश वॉशिंग तंत्राचा वापर करणे, हॉटेलमध्ये टेबलावर पाण्याने भरलेला जग आणि ग्लास ठेऊन लागेल तेवढे पाणी ग्राहकांनाच घेऊ देणे, कोरडे खाद्यपदार्थ पेपरडिशमध्ये सर्व्ह करणे आदी उपाय अवलंबिण्याचे आवाहन केले. हॉटेल असोसिएशन चे अध्यक्ष लतीफभाई यांनी आजपासुन आम्ही पाण्याचा कमी वापर व आपण दिलेल्या माहितीचा आम्ही सर्व हॉटेल व्यावसायीक विचारपूर्वक उपयोग करू आणि पाणी वाचवू असे सांगितले. हॉटेल शिमला इन, सुप्रिम, सहारा, डिसेंट, अ‍ॅप्पल, माउंट मस्तान सर्व हॉटेलधारक सहभागी झाले होते. यावेळी या अभियानाची पोस्टर्स सर्व हॉटेल्समध्ये लावण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच ती शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी लाऊन जनजागृती करण्याचेही निश्चित करण्यात आले. (वार्ताहर)