- सुरेश काटेतलासरी : पावसाळा सुरू झाला की तलासरी परिसरातील खदानी बंद होतात त्यामुळे यंदा पावसाळा सुरू झाला असल्याने पण म्हणावा इतका पडत नसल्याने खदानी मालकांनी पाऊस सुरू होण्याअगोदर खदाणीतून मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन सुरू केले आहे. पावसाळ्यात खदानी बंद होत असल्याने व दगडाला मागणी मोठी असल्याने पावसा अगोदर मोठ्या प्रमाणात दगड काढण्यासाठी प्रचंड क्षमतेचे सुरुंग स्फोट केले जात आहेत, या मनमानी सुरुंग स्फोटाकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.तलासरी भागातील उधवा , करजगाव या गावात वैध बरोबर अवैध खदानी मोठ्या प्रमाणात आहेत. राजकीय व शासकीय आशीर्वाद घेऊन त्या सुरू आहेत.त्यांना महसूल विभागाने परवानगी दिली आहे ना वनखात्याने दगड उत्खनन करताना स्फोटाचा वापर करून नये, असा स्पष्ट निर्देश असतांना तलासरी महसूल विभाग पालघरचे खनिकर्म अधिकारी, खदानीवाले सुरुंग स्फोट करून दगड उत्खनन करू शकतात, असे सांगतात. पण तसे आदेशात नमूद करत नसल्याने, खदानीतील सुरुंग वापराबाबत शंका निर्माण होत आहे.राजकीय व शासकीय आशीर्वाद घेऊन सुरू असलेल्या खदानी मालकांची या भागात दहशत मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या बाबतीत तक्रार दाखल करायला कोणी तयार होत नाही, या खदानीबाबत व त्यात केल्या जाणाऱ्या स्फोटबाबत तलासरी पंचायत समितीचे माजी उपसभापती व सदस्य यांनी कलेक्टर ते प्रांत, तहसीलदारपर्यंत तक्र ार केल्या पण त्यांच्या तक्र ारीची दखल घेण्यात आली नाहीकाही दिवसांपूर्वी करजगाव येथील खदानी मालकाने दगड उत्खनन करण्यासाठी केलेल्या सुरुंग स्फोटाने अख्खे करजगाव हादरले. लोकांना काही वेळ भूकंप झाला असे वाटले, पण त्यांची तक्र ार दाखल करण्याची हिंमत झाली नाही. स्फोट करताना किती प्रमाणात स्फोट करावा असे काही बंधन नसल्याने, मनमानी पद्धतीने स्फोट करण्यात येत आहेत. या स्फोटांनी लोकांच्या घरांना तडे जात आहेत, पाण्याची पातळी खोल जात आहे, तलासरी तालुका हा दुष्कळग्रस्त तालुका घोषित करण्यात आला. उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी काही गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. तालुक्यात मुबलक असलेला पाणी साठा खदानीतील स्फोटाने खोल जाऊ लागला आहे.शासन दुष्काळग्रस्त तालुका म्हणून अनेक योजना राबवित आहे. टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, असे असताना पाणी टंचाईला, व घरांच्या नुकसानीला जबाबदार असलेल्या खदाणीतील सुरुंग स्फोटबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ करून महसूल यंत्रणा या खदानी मालकांना पाठीशी घालत आहे. या मनमानी उत्खनन व सुरुंग स्फोटबाबत एका खदानी मालकाने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दरमहा यंत्रणेला दोन लाखाचा हप्ता दिला जात असल्याने कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.भूकंपाने झालेल्या नुकसानीत पडते आहे भरतलासरी भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत, घरांना तडे जात आहेत. या भीतीच्या सावटाखाली जनता असताना या भागातील खदानीतील सुरुंग स्फोटांनी त्यात भर घातली आहे. भूकंपाबाबत महसूल यंत्रणा निष्क्रिय आहेच. पण सुरुंगाच्या स्फोटाबाबतही ती आर्थिक फायद्यासाठी निष्क्रिय झाली असल्याने तलासरीतील जनता दहशतीखाली आहे. भूकंपाच्या नुकसानीपेक्षा याभागात सुरुंग स्फोटाने नुकसान जास्त होत आहे. पण यंत्रणा आपल्या आर्थिक फायद्यासाठी भूकंपाच्या नावावर ते खपवित आहे अन् जनता कारवाईची वाट पाहत आहे.
तलासरीतील सुरुंग स्फोटांनी गाठली उच्चतम पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:42 PM