शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
2
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
3
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
4
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत
5
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
6
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
7
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
8
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
9
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
10
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
11
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
12
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
13
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
14
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
15
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
16
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
17
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
18
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
19
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
20
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

मद्यपान करून तीन महिन्यांत दोन वेळा ‘हिट अँड रन’; आरोपीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 8:43 AM

गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिले, मात्र यातून कोणताही धडा न घेता याच आरोपीने बुधवारी रात्री पालघर-मनोर मार्गावर पुन्हा एका दुचाकीचालकास फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : शिरगाव येथे मैत्रिणीसोबत बसून दारू पिऊन सातपाटीकडे जीपने जाताना एकाने पाच ते सात वाहनांना कट मारला. याचा जाब विचारणाऱ्याच्याच अंगावर गाडी घालून बेदरकार चालकाने त्याची मोटारसायकल १५-२० फूट लांब फरफटत नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिले, मात्र यातून कोणताही धडा न घेता याच आरोपीने बुधवारी रात्री पालघर-मनोर मार्गावर पुन्हा एका दुचाकीचालकास फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

 याप्रकरणी प्रियेश प्रवीण परमार याच्यावर मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पालघरमधील बिडकोच्या निरलॉन कंपनी मालक असून, त्याच्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत.

दुचाकीचालकांना कट मारून काढला पळ     सातपाटी-शिरगाव रस्त्यावर दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवून पाच ते सात वाहनांना कट मारणाऱ्यास फिर्यादी अमेय चौधरी यांनी सातपाटी येथे अडवून त्याच्या गाडीसमोर दुचाकी लावून त्याला जाब विचारला.     यावेळी त्याच्या अंगावर गाडी घालणाऱ्या प्रियेश प्रवीण परमारवर सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात २० जुलैला गुन्हा दाखल झाला, मात्र त्याला समज देऊन सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती.    तीन महिन्यांनी आरोपीने पुन्हा दुचाकीचालकाला धडक देऊन त्याला फरफट नेले. अपघातानंतर दोन-तीन दुचाकीचालकांना कट मारून तो पळून गेला. स्थानिकांनी आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून त्याला पकडले. निसार खान याच्या तक्रारीवरून कारवाई झाली.

परवाना रद्द होणार?बेदरकारपणे गाडी चालवणे, नुकसान पोहोचविण्याच्या प्रयत्न करणे, आदी कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवून लोकांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने आरोपीचा वाहन परवाना रद्द करणे आणि वाहन जप्त करणे याबाबत आरटीओकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात