शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

हितेंद्र ठाकूर यांनी खानिवली प्रचारसभेत डागली भाजपवर तोफ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 2:08 AM

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या सरकारवर आणि पालघरच्या पालकमंत्र्यांवर तसेच शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावर टीकेची तोफ डागली.

वाडा : पालघर लोकसभा मतदार संघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारसाठी वाडा तालुक्यातील खानिवाली येथे झालेल्या प्रचार सभेत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या सरकारवर आणि पालघरच्या पालकमंत्र्यांवर तसेच शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावर टीकेची तोफ डागली.भाजपने जुन्याच योजनांना नविन नावे देऊन त्या चालू ठेवल्या आहेत. त्यांना कोणत्याही नविन योजना आणता आलेल्या नाहीत. एक खोट दहा वेळा बोलल की लोकांना खर वाटायला लागत तसेच काम भाजपचे चालू आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव देणार होते. तो न देताच आत्ता डबल हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली. गुजरातच्या विकासाचे मार्केटींग करण्यात आले मात्र आपल्या पेक्षाही अधिक गरीबी गुजरातमध्ये असल्याचा दावाही या वेळी हितेंद्र ठाकूर यांनी या सभेमध्ये केला.निवडणुका आल्यात की वसई-विरारची गुंडगिरी संपविण्याची भाषा केली जाते. पाच वर्ष सत्ता तुमचीच होती तेव्हा का नाही आमची गुंडगिरी संपविली असा प्रश्न ठाकूर यांनी केला. बाळासाहेब म्हणत होते कार्यकर्ता गुंड असला तरी चालेल मात्र षंढ असता कामा नये, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत मात्र जनतेच्या सुखसोर्इंसाठी आणि त्यांच्या भल्यासाठीचे आम्ही गुंड आहोत अशी खोचक टीका त्यांनी या वेळी सत्ताधाऱ्यांवर केली.दोन दिवसापूर्वी सर्वांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार करणाºया श्रीनिवास वनगा यांचा पालघर लोकसभेच्या उमेदवारीचा पत्ता कट करून वाºयावर सोडण्याचे काम शिवसेनेने केले असून फक्त खर्च करणारा उमेदवार पाहिजे होता म्हणून भाजपमधून शिवसेनेत घेऊन राजेंद्र गावितांना तिकीट देण्यात आले असे सांगून या पक्षातून त्या पक्षात फक्त सत्तेसाठी बेडूक उडी मारणाºया गावितांवर टीकेची झोड उठवून पालघर जिल्ह्यात शिवसेनेला एकही स्थानिक आदिवाशी उमेदवार मिळाला नाही का..? अनेक पक्षात फिरणारा उमेदवार तुमचे आमचे हित साधणार आहे का..? असे प्रश्न उपस्थित करून मतदानातून हे नंदुरबारचे पार्सल नंदुरबारला पाठविण्याचे आवाहन ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले.पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री हे भाजपचे आहेत मात्र त्यांना जिल्ह्यात विकासकामे करता आलेली नाहीत. जिल्हा नियोजनाच्या बैठकीमधे विकासकामे करण्यासाठी आम्ही सांगून सांगून थकलो मात्र पालकमंत्री नियोजनाच्या बैठकीत काही बोलायला तयार नाहीत तसेच त्यांचा अधिकाºयांवर कोणताही वचक उरलेला नाही. राज्याच्या विधिमंडळामधे खोटी माहिती देण्याचे कामे आदिवासी विकास मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. आदिवासी प्रकल्पात ३५० जणांची भरती करण्यात आली. या ३५० जागांच्या भरतीमध्ये पालघर जिल्ह्याच्या एकाही स्थानिक उमेदवाराला स्थान न देता परजिल्ह्यातील लोकांना नोकºया देण्यात आल्याचा आरोप हितेंद्र ठाकुर यांनी या सभेत केला. या सभेवेळी आमदार हितेंद्र ठाकुर, राष्ट्वादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सुनिल धानवा, मनीष गनोरे, सचिन शिंगडा आदी उपस्थित होते.>चिन्हाबाबत विरोधकांकडून घाणेरडे राजकारणचिन्हाबाबत विरोधकांकडून घाणेरडे राजकारण केले गेले. मात्र चिन्हाबाबत लोकांत एवढी उत्सुकता होती की रिक्षा ही निशाणी रात्री साडेबारा वाजता मिळाली आणि ही निशाणी रातोरात घरोघरीही पोहचली आणि रिक्षा या चिन्हाचा प्रचार आत्ता विरोधकही आपल्या प्रचारादरम्यांन करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. त्याच बरोबर आम्ही शांत बसणारे नाही आम्ही चिन्हाबबत आमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही निवडणूक आयोग तसेच न्यायालायात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.