शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

हितेंद्र ठाकूरांना तुरुंगात डांबू -मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:40 IST

वसईतील घोटाळ्यांची एसआयटी चौकशी; विरारच्या प्रचारसभेत फडणवीसांचा ह्ल्लाबोल

वसई : वसई विरार मधील घोटाळ्यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना तुरु ंगात पाठवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सोमवारी विरार मध्ये आले होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या कारभारावर जोरदार टीका केली.पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रचार ऐन रंगात आला असून सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरारच्या मनवेल पाडा येथे जाहीर सभा घेतली. मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यामुळे यंदा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आपल्या अर्ध्या तासांच्या भाषणाची सुरवात फडणवीस यांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर नाव न घेता केली. मी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला तसेच तुरूंगात जायलाही घाबरत नाही असे ठाकूर यांनी सांगितले होते. त्याचा संदर्भ देत तुमची वेळ आली की तुम्हाला तुरुंगात पाठवू, कोठडीत पुष्कळ जागा आहे असे ते म्हणाले.वसई विरार मधील बांधकाम व्यावासयिकांकडून घेतला जाणारा फंड हा झोलझाल फंड आहे, अशी टीका त्यांनी केली. वसईत लाखो अधिकृत घरांना मंजुरी दिली असून यापुढे कुणालाही झोलझाल फंड देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. वसई विरार मधील सर्व घोटाळ्यांची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून केली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. वसई विरार मध्ये नळजोडणीसाठीही भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर सर्व नळजोडणी प्रक्रि या आॅनलाईन केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. वसईतील गावे वगळ्याबाबत न्यायालयात सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र याबाबतीत जे वसईकरांचं मत आहे, तेच सरकारचं मत आहे, असे ते म्हणाले. आपल्या भाषणात फडणवीस यांनी मोदी सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. ५६ पक्षांच्या आघाडीवर महाखिचडी अशी टीका केली. भाजप हा देशप्रेमींचा पक्ष आहे तर ५६ पक्षांची आघाडी महाखिचडीचे सरकार आहे असे सांगितले.निवडणूकीनंतर नळ कनेक्शन करणार आॅनलाईनपोटनिवडणुकीत सेना भाजपा एकत्र नव्हती त्यावेळीही पालघर मधील लोकांनी शिवसेना आणि बिजेपीमध्ये मतदान करून बविआला तिसऱ्या स्थानावर पाठवले होते. यावेळच्या निवडणुकीत वाघ आणि सिंह एकत्र आल्यानंतर कोल्हे आणि लांडगे एकत्र आले तरी आता पालघरची लढाई विरोधक जिंकू शकत नाही. त्यांची निशाणी शिट्टी होती त्यांची निशाणीच आता गुल झाली आहे.आता या लोकांना जागा दाखवायची वेळ आली असल्याने त्यांना त्याची जागा दाखवा असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. देश स्वतंत्र झाला पण वसई विरार मधील लोकांना स्वातंत्र्य नाही, त्यांना जखडून ठेवले आहे, त्यामुळे ही लढाई देशाची नसून वसई विरारच्या मुक्तीची लढाई आहे. येथील प्रत्येक झोलझाल योजनेचा योग्य ती चौकशी करून त्यांची पोलखोल करू असे सांगितले.जेलमध्ये भरपूर जागा असून ते दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात येईल. पाण्यासाठी पैसे मागितले जातात यामुळे पाण्याचे कनेक्शन आॅनलाइन केले जाणार आहे. निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यावर तशी आॅर्डर काढली जाणार असल्याचे सांगितले. २९ गावे वगळण्यासाठी नक्कीच मदत करणार असेही शेवटी सांगितले.होय मी गुंड आहे -हितेंद्र ठाकूरनालासोपारा : शनिवारी कासा, वाणगाव, मनोर याठिकाणी प्रचार सभेच्या दरम्यान बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उघडपणे मी गुंड आहे, असे विधान केले असून उद्धव ठाकरे यांनी वसईमधील गुंडगिरी मोडण्याचे सांगितले असेल तर मी षंढ नसून गुंडा आहे असे म्हटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवस फिरत असून तसेच मी ईडीला घाबरत नसून मी काही शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाही असेही प्रत्येक ठिकाणी ते सांगत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHitendra Thakurहितेंद्र ठाकूर