शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

ग्रामीण भागांत प्रथा-परंपरा जपत होळींची आज होणार पूजा; स्थलांतरित मजूर परतले गावाकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:45 PM

रंगपंचमीला आजही गावाकडे झाडपाला, फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगच वापरला जातो.

राहुल वाडेकरविक्रमगड : बदलत्या काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले तरी अजूनही विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागांतील शेतकरी व मजूर धुळवडीच्या उत्सवात चालत आलेल्या रुढी, परंपरा, प्रथा जपण्याचा व पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदा तालुक्यात दोन हजार होळ्या उभारण्यात येणार असून प्रत्येक घरातून होळीमातेची विधिवत पूजा केली जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी धुळवडीचे रंग उधळून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, स्थलांतरित मजूरही गावाकडे होळीसाठी परतले आहेत. 

शहरी भाग सोडला तर बहुतेक सर्वच गावखेड्यांमध्ये एक गाव एक होळीची प्रथाही आजही जपण्यात येत आहे.होळीनिमित्त महिलांनी तांदळाच्या पिठापासून दोन दिवस अगोदरच तयार केलेल्या पापड्यांचा होळीला व पूजेच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. होळीसाठी लहान मुले, तरुण मंडळी प्रत्येक घराघरातून लाकडे, पेंढा, गवत, बांबू गोळा करून गावाच्या मध्यभागी माळाच्या ठिकाणी (होळीची जागा) ठेवून दिले जाते. ग्रामीण भागातील महिला रात्री चंद्र उगवल्यानंतर नटूनथटून तर लहान मुले गळ्यात साखरगाठ्या (साखरेची माळ) घालून ढोलताशाच्या गजरात आरत्या घेऊन गावाच्या मध्यभागी सगळे जमतात. 

रंगपंचमीला आजही गावाकडे झाडपाला, फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगच वापरला जातो. वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून आदिवासी भागात होळीचा सण साजरा केला जातो. होळी सणासाठी साखरेपासून बनविलेल्या हलव्याचे दागिने म्हणजेच हरडे-करडे (साखरेची गाठी व साचार गाठीचे वेगवेगळे अलंकार) यांना मोठ्या प्रमाणावर महत्त्व असल्याने ते खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असते. ते हातात व गळ्यात घालून तसेच होळीला अर्पण करून होळीचा सण ग्रामीण भागात साजरा करण्यात येतो.

तारपानाच, गरबानृत्य रंगणारनवीन लग्न झालेल्या जोडप्याने एकमेकांचे हात पकडून होळीभोवती फिरून संसाराला अग्नीपासून संरक्षण दे, आमचा राग, द्वेष, लोभ, मत्सर या आपल्या अग्नीत जळून खाक होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. होळी व धुळवडीच्या दोन दिवस ग्रामीण भागात खेड्यापाड्यांवर रात्रभर ढोलनाच, तारपानाच, गरबानृत्य आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. या दोन दिवसांत होळीच्या व धुळवडीच्या दिवशी घरोघरी गोड पुरणपोळ्या केल्या जातात. 

टॅग्स :Holiहोळी