वसई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वसईमध्ये त्यांना अर्कचित्र माध्यमातून साकारलेल्या विविध भावमुद्रांचे फोटो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन महिला व्यंग चित्रकार राधा गावडे यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आले असून त्याला मोठ्या संख्येने वसईकरांनी गर्दी केली होती.वसईतील पापडी हुतात्मा स्मारकाजवळ आर्यन आर्ट गॅलरीत या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी प्रसिद्ध फाईन आर्टीस्ट शंकर मोदगेकर व व्यंग चित्रकार नितिन निगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक राधा गावडे, प्रसिद्ध छायाचित्रकार प्रविण दांडेकर, संजय पवार, अमोद गावडे, स्नेहा शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात बाळासाहेबांच्या विविध भावमूद्रा अर्कचित्रातून महाराष्टातील २७ दिग्गज कलाकारांनी रेखाटून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे. आयोजक राधा गावडे या स्वत: व्यंग चित्रकार असून त्यांनी या कामी पुढाकार घेतला होता.त्याला मूंबई, पूणे, नागपूर, धुळे, अमरावती, बेळगांव येथील अर्कचित्र कलाकारांनी प्रतिसाद देत आपल्या कलाकृती या प्रदर्शनात पाठविल्या होत्या. २७ कलाकारांच्या ५५ अर्कचित्रे या प्रदर्शनात असून प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांचेही निवडक व्यंगचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन रविवारी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत लोकांसाठी खुले असणार आहे.अनेक अर्कचित्रांची वसई करांकडून प्रशंसाया अर्कचित्रांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमूद्रा कलाकारांनी रेखाटल्या आहेत.त्यात मराठी माणसा जागा हो,लेखणीची ताकद,रिमोट कंट्रोल, स्वर्गातही साहेबच,माय नेम इज वेल खान,अद्दुष्य शक्तीतील बाळासाहेब आदि अर्कचित्रांना प्रेकक्षांकडून दाद देण्यात येत होती.अनेकांनी या प्रदर्शनांचे कौतूक करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिला साजेशी आदरांजली व्यक्त केली गेल्याचा अभिप्राय व्यक्त केला.२७ अर्कचित्रकारांच्या ५५ कलाकृतीया प्रदर्शनात नितिन निगडे (मूंबई), प्रभाकर वाईरकर (मूंबई), चारूहास पंडीत (पूणे), घन:शाम देशमुख (पूणे),विनय चानेकर (नागपूर), गजानन घोंगडे (अकोला),गौरव यादव (मूंबई), योगेश चव्हाण (मूंबई),विकास सबनिस (मूंबई),राधा गावडे (मूंबई), शरयु फरकांडे (मूंबई), भरत जगताप (बेळगांव), विवेक प्रभू केळूस्कर (मूंबई), विश्वास सुर्यवंशी (पूणे), दिनेश धनगव्हाळ (धुळे), अतुल पुरंदरे (पूणे),योगेंद्र भगत (पूणे), आशूतोष वाळे (नाशिक ), सिद्धांत जुमडे (मूंबई),वैजनाथ दुलंगे (पूणे), प्रदिप म्हापसेकर (मूंबई) व विजयराज बोधनकर (मूंबई) या अर्कचित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
वसईत अर्कचित्र प्रदर्शनातून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना; मोठ्या संख्येने रसिकांनी केली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 12:20 AM