शौकत शेख
डहाणू : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरलेल्या निवासी शासकीय वसतीगृहातील २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात नववीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास प्रकल्पाने प्रवेश नाकारल्याने आदिवासी विद्यार्थी, पालक तसेच विविध आदिवासी संघटनामधुन संताप व्यक्त होत असून शिक्षणासाठी आदिवासी मुलामुलींना दररोज वीस ते पंचवीस कि.मी. अंतरावरून शाळेत ये-जा करण्याची वेळ आली आहे.
बहुसंख्य आदिवासी लोकवस्ती असलेल्या डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मुंबई, वसई, पालघर, डहाणू, बोर्डी, कासा भागांतील महाविद्यालयात शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ, तसेच महत्वाच्या शहरात निवासी शासकीय वस्तीगृह सुरू केले त्यामुळे बहुसंख्य माध्यमिक तसेच उच्चशिक्षण घेणाºया हजारो आदिवासी विद्यार्थ्यांची सोय झाली. परंतु गेल्या दोन वर्षापासून आदिवासी प्रकल्पाने शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू कैैल्यान दºया खोºयांत राहणाºया आदिवासी विद्यार्थी तसेच पालकांचा गोधळ उडला आहे.गेल्या पाच ते सहा महिन्यापासून डहाणू प्रकल्प कार्यालयात स्वतंत्र प्रकल्प अधिकारी नसल्याने शासकीय वसतीगृह तसेच निवासी आश्रमशाळांचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच निवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा प्रवेश, सोयी-सुविधांबरोबरच अहाराचे नियोजन करणे आवश्यक असतांना देखिल, जून महिन्याचे म्हणजेच शाळा, महाविद्यालय सुरू झाल्यानंतर वस्तीगृह क्षमता, वाढीव इमारत क्षमता बाबतीत प्रस्ताव पाठविले जात असल्याने चार, पांच, महिने वस्तीगृह प्रवेशासाठी आदिवासी मुला-मुलींना वाट पहावी लागते. या प्रकल्पाअंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई येथे १७ निवासी शासकीय वस्तीगृह आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिक्षण घेणाºया आदिवासी मुलांची संख्या दुप्पट, तिप्पट, झाली असतांना मात्र शासकीय वस्तीगृह तसेच आश्रम शाळेची संख्या व क्षमता जैैसे थे असलयाने दर वर्षी शेकडो मुले मुली वस्तीगृहापासून वंचीत राहत असतात. जिल्हयात वस्तीगृहाची एक इमारत वाढत नसलयाने डोंगरकुशीत राहणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षाणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, वर्ष २०१७-१८ मधील शासकीय निवासी वस्तीगृहात नववीचे २९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र यावर्षी नववीचे एक ही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही. या बाबतीत डहाणू आदिवासी प्रकल्प कार्यालयात चौकशी केली असता. शासन निर्णया प्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहे. असे सांगण्यात आले. गेल्या वर्षी निवासी वस्तीगृहात १७ वस्तीगृह एकूण १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटले तरी केवळ १३०० विद्यार्थ्यांनाच अद्याप प्रवेश देण्यात आला आहे. उर्वरित ३०० विद्यार्थी हे अद्याप वस्तीगृह प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहे. शिवाय बोर्डी, तसेच कासा येथील मुलांचे वस्तीगृहात इमारत क्षमतेनुसार अद्याप विद्यार्थ्यांची जागा रिक्त असतांना ही तिथे अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैर सोय झाली आहे.