पालघर : उपलब्ध साधनसामग्री आणि नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर करून इथल्या महिला बचत गटांनी नवनवीन उत्पादने निर्माण केली आहेत. त्यांंची विक्री व्हावी या साठी जिल्ह्यातील हॉटेल आणि रिसॉर्ट मालकांनी थोडी जागा उपलब्ध करून द्यावी या जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने बचत गटांना आता आर्थिक स्थैर्य मिळणार आहे.
राज्य व केंद्र शासनाने बचत गटासाठी विविध विकास योजना आखल्या असून त्यांनी उभ्या केलेल्या व्यवसायाला बँके कडून होणाºया कर्जपुरवठयावरील मुद्रांकशुल्क ही माफ केले आहे. या कर्जाद्वारे उभारण्यात आलेल्या व्यवसायाची वृद्धी होऊन त्या महिला आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम होणे अपेक्षित आहे. त्यासाठी बचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी सरस महोत्सव आयोजूनही फारसा उपयोग होत नव्हता त्यामुळे बचतगट नाउमेद होत होते. त्यामुळे या उत्पादनांना कायमस्वरूपी जागा मिळावी याकरीता महामार्गालगतच्या हॉटेल व ढाब्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी जिल्हाधिकाºयांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.मुख्यमंत्री कार्यालयातून बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्र ीसाठी काही विशेष धोरणे आखण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्यानंतर गुरुवारी नियोजन भवनात जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स मालक, रिसॉर्ट मालक आदींची बैठक बोलाविण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, मंत्रालयीन अधिकारी प्रिया खान, नियोजन अधिकारी गो. रा. भारती, तहसीलदार उज्वला भगत सह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
जिल्ह्यात एकूण १० हजार ८२३ बचत गट असून पालघर तालुक्यात ४ हजार १०५ बचत गट, डहाणूमध्ये १ हजार ०२८ तलासरी तालुक्यात १ हजार ९४५, विक्रमगड १ हजार ४१३, जव्हार २ हजार ००३, मोखाडा १ हजार ०१७, वाडा १ हजार ४७७, वसई ६९८ इतके बचत गट असून १ लाख ४४ हजार ६६१ महिलांचे संसार अवलंबून आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाने पर्यटनाबाबत उघडलेल्या वेबसाईट मध्ये आपले नाव, हॉटेल-रिसॉर्ट चे नाव, पत्ता, इ-मेल नंबर नोंदविण्याची विनंती केली.तसेच प्रत्येकाने आपल्या हॉटेल-रिसॉर्ट मध्ये ‘कंटेनर टाइप शॉप’ साठी छोटीशी केबिन बचतगटांच्या माल विक्र ीसाठी तयार करावी या जिल्हाधिकाºयांच्या विनंतीला सर्वांनी मान्यता दिली.त्यामुळे नैसर्गिक औषधी वनस्पती, कंदमुळे, सुके मासे, त्यापासून बनविलेली लोणची आदी नानाविध पदार्थ, बांबू पासून बनविलेल्या वस्तू, वारली चित्रकला, आदी उत्पादित वस्तू हॉटेल्स, रिसॉर्ट मध्ये येणाºया पर्यटकांपर्यंत पोहचून यातून विक्रीची उलाढाल वाढून बचतगटांचे सक्षमीकरण होणार आहे.महामार्गालगतची हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत चालू ठेवाअनेक मागण्या केल्या सादरच्बैठकी दरम्यान हॉटेल-रिसॉर्ट व्यावसायिकांच्या अनेक समस्यांबाबत आपले म्हणणे मांडताना किनारपट्टीवरील, केळवे, डहाणू, बोर्डी पर्यटनस्थळाकडे अधिक पर्यटक आकर्षित करण्याच्या दृष्टीने स्कुबा डायव्हिंग,वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, निर्माण करावे.च्मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक २४ तास सुरू असल्याने रात्री ११ वाजता हॉटेल्स बंद करण्याचे आदेश असल्याने परिमटरुम वगळता खाद्यपदार्थ ठेवणाºया हॉटेल्स उशिरापर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी मिळावी. करण्याबाबत तात्काळ पावले उचलली जावीत.च्वसई तालुक्यातील किनाºया वरील अनेक हॉटेल्स मालकांनी बांधकामाची रीतसर परवानगी मिळवूनही त्यांना बांधकामाची परवानगी न देता उलट तोडण्याच्या नोटीसा बजावल्या जातात, जव्हार मध्ये दाभोसा, जयविलास पॅलेस, हनुमान पॉर्इंट्स या सारख्या स्पॉटकडे जाण्यासाठी रस्ते करावेत.च्जिल्ह्यातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे येथे मूलभूत सुविधा तातडीने निर्माण केल्या जाव्यात आदी मागण्या केळवे बीचपर्यटन उद्योग विकास संघाचे अध्यक्ष आशिष पाटील व हॉटेल, रिसॉर्ट, ढाबे व्यावसायिकांनी यावेळी जिल्हाधिकाºयांकडेकेल्यात.