शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

म्हाडा गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:44 PM

म्हाडा व स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा व दुर्लक्ष : मूलभूत सुविधांचीच कमतरता, रहिवाशी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : म्हाडाच्या कोकण विभागाने २०१४, २०१६ आणि २०१८ साली विरार बोळींज येथील सदनिकांची सोडत काढली होती. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना १०० टक्के रक्कम भरून ताबा देण्यात आला. मात्र या गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांचे अतोनात हाल होत आहेत. म्हाडा व स्थानिक प्रशासनही त्याकडे निष्काळजीपणा दाखवून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या प्रकल्पातील नागरिक करीत आहेत.या गृहप्रकल्पात सहभागी झालेल्या सदनिकाधारकांनी म्हाडाची सदनिका आणि त्यासंदर्भात सुविधा असतील या भाबड्या आशेपोटी उर्वरित रक्कम म्हाडाला विहित मुदतीत भरली. सुरुवातीला म्हाडाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे अर्जदारांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. बऱ्याच वेळा चकरा मारल्यानंतर कामे होत होती. या सर्व दिव्यातून जाऊन म्हाडाने सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरुवात केली. परंतु बरीच कामे अपूर्ण होती. उदा.विजेची जोडणी, पाण्याची जोडणी, सामायिक सुविधा, कचºयाची समस्या इत्यादी. सध्या जवळपास १५०० विजेत्यांनी सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. बरेच सदनिकाधारक राहायला यायला तयार नाहीत. कारण मूलभूत सुविधांचीच कमतरता आहे.सदनिकाधारकांनी वेळोवेळी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वरील बाबी आणून सुद्धा म्हाडाकडून कुठलीही अपेक्षा पूर्ण होत नाही आहे. म्हाडाच्या अधिकाºयांनी आश्वासन दिले की, आॅक्टोबर २०१९ पर्यंत महापालिकेच्या पाण्याची जोडणी होईल. परंतु आजतागायत याबाबत एक छोटेसे काम पण झालेले दिसत नाही. सध्या म्हाडा वसाहतीमध्ये पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. वसई-विरार महापालिकेचे पाण्याचे कनेक्शन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत टँकरने पुरेसे पाणी पुरवठा करणार असे सांगितले, परंतु टँकरनेही दररोज पाणीपुरवठा होत नाही. जे पाणी सध्या पुरवले जाते ते पिण्यालायक तर अजिबात नाही. टँकरने पुरवले जात असलेले पाणी एकदम गढूळ असते अशी नागरिकांची तक्रार आहे.किमती कमी करण्यासाठी निवेदनफेब्रुवारी २०१९ पासून या सदनिकांच्या किमती रेडी रेकनर व बाजारभावापेक्षा चढ्या असल्याने त्या कमी करण्यासाठी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत व म्हाडा प्रशासन यांना निवेदन दिले होते. त्यानंतर म्हाडाचे अधिकारी विजय लहाने यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करत २०४ रुपये प्रति चौरस फूट दराने कमी केल्या जातील व त्याचा लाभ २०१८ च्या लॉटरी विजेत्यांसोबतच २०१४ व २०१६ च्या लॉटरी विजेत्यांनाही रोख रकमेच्या स्वरूपात मिळेल, अशी माहिती देण्यात आली होती.मात्र गेल्या दहा महिन्यात म्हाडा प्रशासनाने चालढकल केल्याचा आरोप केला जात आहे. ३ डिसेंबर २०१९ च्या जीआरनुसार ४० ते ५० हजार रुपये मूळ किमतीमध्ये कपात करून कमी केलेल्या मोबाईल सेवाशुल्काच्या पद्धतीने वळता करून घेण्याचा निर्णय लागू केला आहे. त्यामुळे म्हाडा प्रशासनाने पुन्हा विरारच्या रहिवाशांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसलीआहेत, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.म्हाडाने भरपाई का देऊम्हाडाकडून सुविधा पुरवण्यास कितीही विलंब लागला तरी चालतो, परंतु जर विक्रीची किंमत वेळेत भरली नाही तर ११ टक्के व्याजाने वसूल केले जाते. म्हणजेच म्हाडाला सर्व काही माफ, पण तेच सामान्य माणसाला थोडा विलंब झाला तर ११ टक्के व्याज भरावे लागते आणि काही सदनिकाधारकांनी तर जवळपास १ लाख रुपये व्याज भरलेले आहे. मग सुविधा पुरवण्यात विलंब झाल्यास म्हाडाने भरपाई का देऊ नये, असा उद्विग्न प्रश्न रहिवासी विचारात आहेत.म्हाडाची लॉटरी लागल्यापासून ते प्रत्यक्षात घराचा ताबा मिळेपर्यंतची किचकट प्रोसेस, म्हाडाच्या ढिसाळ नियोजनामुळे येणाºया अडचणी, प्रामुख्याने पाणीटंचाई आणि हे स्वप्नातले घर घेण्यासाठी उभारलेला कर्जाचा डोंगर पाहिल्यास रहिवाशांना आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला दिसत नाही. अशा सर्व गंभीर समस्यांनी म्हाडा विरार बोळींज रहिवासी त्रासलेले आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे. नये?