शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लगीन घरी पाऊसाने उडवली वºहाडाची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:43 AM

लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले

बोईसर : लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले. लगीन घरी अनपेक्षितरित्या दाखल झालेल्या वादळी पावसाने तारांबळ उडवली.अवकाळी पावसाच्या या फटकेबाजीमुळे सिमला मिरची सह भाजीपाला उत्पादकही प्रचंड चिंतेत टाकले आहे. अरबी समुद्रातील ओखी चक्र ीवादळ किनारपट्टीला धडकण्या अगोदरच पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागा सह सर्वत्र सुरू झालेल्या मुसळधार वादळी पाऊसामूळे विवाह सोहळ्या करीता उभे करण्यात आलेल्या लग्न मंडपांना धोका पोहचला असून अनेक ठिकाणी वºहाडांची पळापळ झाली आहे. दल दल आणि चिखलमय जमिनीवर मंडप कसे उभारायचे त्याच बरोबरच पाहुणे मंडळींच्या कार पार्र्किंगचा मोठा प्रश्न लग्न असणाºया घरातील मंडळीना पडला आहे.सोमवारी सायंकाळी तारापूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभारे यांनी तारापूर येथील समुद्र किनारी वास्तव्यास असलेल्या मच्छिमारांनची बैठक घेऊन खबरदारी म्हणून कुणीही किनारपट्टी भागात जाऊ नये असे आवाहन केले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजे पर्यंत बोईसर सर्कल भागात १५.४ मि. मी. तर तारापूर सर्कल मध्ये १५.४ मी. मी. इतका पाऊस पडला असून मंगळवारी दिवसभर कधी मुसळधार तर कधी रिप रिप असा पाऊस सुरू होता.यामुळे हवेत गारवा येऊन हूडहुडी भरत होती. पाऊसाचा सर्व घटकातील नागरिकांसह मंडप डेकोरेटर, गवत- पावली व्यापारी, शेतकरी, मच्छीमार, सिमला मिरचीचे व भाजीपाला उत्पादक, बोईसर मध्ये सुरू असलेली सर्कस इत्यादी सर्व व्यावसायिकांना जबर फटका बसून मानिसक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. तर हीच परिस्थिती पुढील काही दिवस राहणार असल्याची माहती हवामान खात्याकडून मिळत आहे.पावसामध्ये कार्पेट, उच्च प्रतीचा कपडा, लायिटंग, सोफा व इतर साहित्य कमी जास्त फरकाने भिजल्याने प्रचंड नुकसान होणार आहे तर काही कामे रद्द झाली असून पुढील आॅर्डरच्या वेळी ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागणार आहे.- दिलीप शिर्के, मालक ,मंडप डेकोरेटर ,बोईसर