संजय नेवे।विक्रमगड : गोर गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल योजना अमलात आली असली तरी कागदोपत्री अडथळे आणि अनियमित हप्त्यांमुळे तालुक्यातील अनेकांची घरे अर्धवट आहेत. टप्प्यांमध्ये मिळणारे अनुदान उशिराने मिळत असल्याने गत चार वर्षांपासूनच्या योजना रेंगाळल्या आहेत. २०१५ पासून उपलब्ध आकडेवारीमध्ये आतापर्यंत कोणत्याही वर्षी ही योजना पुर्णत्वास जाताना दिसत नाही. ग्रामीण भागातील द्रारिदय रेषेखालील अनुसुचित जाती जमातीच्या व्यक्तींना तसेच इतर प्रवर्गातील गरीब व्यक्तींचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवाज योजना सुरू केली आहे.तसेच, राज्य शासनाची घरकूल योजना सुरू असून या योजने अंतर्गत तालुक्यात वर्ष २०१५-२०१६ या काळामध्ये २१७३ घरकुलाना मंजूरी मिळाली होती. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून १ लाख २० हजार रूपयाचे अनुदान देण्यात येते. तर, इंदिरा गाधी आवास योजनेतून ९५००० हजारचे अनुदान दिले जाते. त्यातील १९८५ घरकुलांचे काम पुर्ण झाले असून १८८ घरकुलांचे काम अपूर्ण आहे.आज ही घरकुले २०१५-२०१६ पासून १०० टक्के पूर्ण झालेली नाहीत. त्यात लाभार्थ्यांनी पूर्ण केली नाहीत किंवा शासकीय दिरगाई मुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. याचा शोध घेणे जरूरीचे आहे. या आदिवासीभागात द्रारिदय रेषेखालील लाभार्थ्यांना घर पुर्ण करून घेणे गरजेचे आहे. या साठी वेळीत अनुदान मिळावे अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.२०१७-१८मध्ये एकही घरकुल पूर्ण नाहीआर्थिक वर्ष २०१६-२०१७ या काळामध्ये ८०९ घरकुलां पैकी फक्त १४३ घरांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. २०१७-२०१८ या वर्षी ३१० घरकुलापैकी अजून एकही घरकुले पूर्ण झालेली नाही. ती का झाली नाहीत याबाबत चौकशी केली असता घरकुलाचे पैसे वेळेवर मिळत नाही अशी माहिती उपलब्ध झाली.या लाभार्थीना वेळेवर अनुदान मिळत नाहीत. त्यामुळे घरकुले वेळेत बांधता येत नाहीत. तसेच, पूर्णत्वाचा दाखलाही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी हैराण होतो. यासाठी वेळेत अनुदान मिळावे अशी मागणी माकपचे किरण गहला यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.अर्धवट राहीलेली ही घरे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पुर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त १७,२०० रूपये लेंबर मजूरी देऊन ती पुर्ण होणार आहेत.- बाबासाहेबगायकवाड,प्रकल्प अधिकारी(पं. स. विक्रमगड)
गोरगरिबांची घरे राहिली अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:30 AM