- राहुल वाडेकर, विक्रमगडनववर्षाच्या स्वागतासाठी व थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी शुक्रवारपासूनच येथील फार्महाऊसवर पर्यटक येण्यास प्रारंभ होणार आहे. त्यांचे बुकींग फुल्ल झाले आहे. नववर्षाचा शुभारंभ रविवारी असल्याने शनिवार आणि रविवार असे दोनही दिवस चे सुरू राहणार आहे. विक्रमगड, जव्हार व मोखाडा ही ग्रामीण भागातील निसर्ग सौदर्यांनी नटलेली शुध्द हवा व स्वच्छ वातावरण येथे अनुभवता येत असल्याने व महानगरात पोलिसांचा जसा ससेमीरा असतो. तो इथे नसल्याने गेले काही वर्षे येथील फार्महाऊसला महानगरवासियांनी सर्वाधिक पसंती दर्शविलेली आहे. विक्रमगड तालुक्यात जवळपास ४०ते ५० फार्महाऊस आहेत.शहरातल्या महागड्या बारमध्ये खाणे-पीणे परवडत नाही, त्यापेक्षा असे एखादे फार्महाऊस भाड्याने घेऊन तेथेच असलेल्या खानसाम्याला मास, मच्छि, मटण करण्याची आॅर्डर द्यायची व यथेच्छ प्यायची. हे अधिक चांगले. ते स्वस्त आणि मस्तही ठरते. असा अनेकांचा अनुभव असल्याने येथे दरवर्षी होणारी गर्दी वाढते आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता ग्रामीण पोलिसही सज्ज झाले असून अवैद्य मद्यधुंद वाहनचालकांना आवर घालण्यासाठी जागोजागी अदल्या दोन दिवसांपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करणार असल्याचे समजते.
फार्महाउस झाले हाउसफुल्ल!
By admin | Published: December 30, 2016 4:14 AM