बोर्डी : कॅफेचे प्रतिमहिना येणारे वीजबील मीटर रिडिंगनुसार नसून सरासरी पेक्षा कमी येते. तथापि चार-पाच महिन्यांचे एकत्रित बील आल्यास मोठी रक्कम भरणे अशक्य होईल असे निवेदन अभिलाषा बाफना या उद्योजिकेने नोव्हेंबर महिन्यात दिले होते. मात्र, महावितरणने वेळीच दखल न घेतल्याने पाच महिन्यांचे २५ हजारांचे बील भरावे कसे असा सवालकरीत, या विभागाच्या पालघर कार्यालयात तिने तक्र ार नोंदवली आहे.
शहरातील महालक्ष्मी प्लाझा येथे बाईट जंक्शन नावाचा कॅफे अभिलाष बाफना चालवितात. त्यांना प्रतिमाहिना चार ते पाच हजार बील येणे अपेक्षति आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात अकराशे रु पये बील आले. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिल्यास सहा महिन्यांनी मोठ्या रकमेचे बील येऊ शकते. हा संभाव्य धोका लक्षात घेतल्यास, आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तथापी महावितरणच्या डहाणू कार्यालयात अर्ज केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु जानेवारी उलटूनही त्यामध्ये बदल झाला नाही. नाईलाजास्तव त्यांनी प्रत्येक महिन्यात येणारी बिलांची रक्कम अदा केली.
१४ फेब्रुवारी रोजी २५ हजारांचे बील एकत्र भरण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यांनी या बाबत आॅनलाईन तक्र ार केल्याचे म्हटले आहे. तर २५ फेब्रुवारीला पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे कॅफे चालविणे कठीण बनून, आर्थिक समस्येला सामोरे जावे लागेल. त्याविषयी पुढच्याच दिवशी पालघरच्या कार्यालयात पुन्हा तक्र ारीद्वारे दाद मागितल्यावर जोडणी पूर्ववत करण्यात आली. दरम्यान आपणास आलेले बील योग्य आहे, परंतु एवढी रक्कम एकत्र भरण्याऐवजी तीन-चार हफत्यांची सवलत देण्याचा प्रस्ताव बाफना यांनी ठेवला आहे. तो मान्य होईल अशी माहिती या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खाजगीत बोलताना दिली.
वापरलेल्या रिडींग पेक्षा वीज बील कमी येत होते. शिवाय बिलावर रीडिंगचा फोटोही नव्हता. चार-पाच महिन्यांचे बील एकत्र आल्यास आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने योग्य दखल घेण्याची मागणी कार्यालयाकडे केली होती. परंतु दखल घेतली नाही. फेब्रुवारीत २५ हजारांचे बील भरण्याचे सांगत, सोनावणे नावाच्या कर्मचाऱ्याने उद्धट उत्तर दिले. या समस्येविषयी पालघर कार्यालयात तक्र ार नोंदवली आहे.-अभिलाषा बाफना(कॅफे मालक)