विक्रमगड : येथील पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांची इमारत पूर्ण होऊन पाच वर्षे झाली. परंतु अजूनपर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ती विक्रमगड पंचायत समितीच्या ताब्यात ती न दिल्याने धूळ खात पडली आहे. तसेच तिचा वापर नसल्याने तिच्या इमारतीचे काचा फुटल्या आहेत. तसेच विजेचे मीटरही काढून नेण्यात आले आहे तर कर्मचारी ही न राहिल्यामुळे ही अवस्था झाली आहे.या पंचायत समितीच्या आवारात बांधण्यात आलेल्या इमारतीवर ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु गेल्या पाच वर्षांपासून का ताब्यात दिली नाही हे पंचायत समितीच्या प्रशासनालाही माहीत नाही. प्रशासनाने अनेक वेळा इमारत ताब्यात देण्यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्र व्यवहार केला. परंतु इमारत ताब्यात संदर्भात कोणतीच हालचाल झाली नाही ही इमारत व कर्मचारी निवास ताब्यात नसल्याने कर्मचाऱ्यांनाही निवासस्थाने देता येत नाही त्यामुळे त्यांना नियुक्तीच्या गावी राहता येत नाही. त्यामुळे त्यांच्या कामावरही विपरित असा परिणाम होत असतो. (वार्ताहर)ही इमारत पंचायत समितीच्या ताब्यात मळावी यासाठी बांधकाम विभागाला अनेक वेळा पत्रव्यवहार केला परंतु काहीच होताना दिसत नाही.’’- एस. डोलारे, गट विकास अधिकारी
नवीन निवासस्थाने पं.स.कडे कधी होणार हस्तांतरीत?
By admin | Published: February 22, 2017 5:57 AM