- पंकज राऊतबोईसर : येथील अवधनगर मधील बाबूभाईच्या भंगार गोडाऊनमध्ये आॅक्सिजन सिलिंडरच्या झालेल्या भीषण स्फोटमध्ये हजारी राम सुरत मौर्या (अंदाजे ३५ वर्षे) हा जागीच ठार तर छोटू हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बोईसर येथील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असून या संदर्भात बोईसर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.आज (दि.०९) दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान आॅक्सिजन व एलपीजी गॅसच्या साहाय्याने लोखंडी भंगार कटींगचे काम सुरू असतांना ही घटना घडली त्यावेळी प्रचंड मोठा आवाज परिसरात आला. आॅक्सिजन सिलिंडरचा एवढा भीषण स्फोट झाला की, त्याचे तीन तुकडे झाले त्यातला एक मौर्या याच्या शरीरावर आदळून त्याचे पाय, हात व छातीपोटाचा भाग वेगळा झाला.तर दुसरा तुकडा भंगार गोडाऊनच्या छताच्या पत्र्यावर आदळून काही पत्रेही फुटले, तिसरा तुकडा शेजारच्या भिंतीवर आदळला ही घटना घडल्यानंतर काही वेळ एकच गोंधळ माजला होता. प्रथम कुणालाही काही कळत नव्हते.
गोडाउनमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, एक ठार तर एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 3:41 AM