-आशिष राणे वसई
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई पूर्व एवरशाईन सिटीमधील दोन्ही प्लॅट मध्ये त्या कुटुंबाला लोभान धूप लावणे चांगलेच महागात पडले आहे.
धक्कादायक प्रकार म्हणजे अचानकपणे लोभान धुपाने ड्युबलेक्स पध्दतीच्या या दोन्ही प्लॅट मध्ये पेट घेतला आणि बघता बघता सातव्या मजल्यावर असलेले हे संपूर्ण प्लॅटच जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली आहे
वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून मिळलेल्या माहितीनुसार , वसई पूर्वेस एवरशाईन सिटीत स्टार रेसिडेन्सी मधील सातव्या मजल्यावर असलेल्या एका कुटुंबाच्या प्लॅट क्रं.702 या सदनिकेला गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास अचानकपणे आग लागली आणि एकच धावपळ उडाली
दरम्यान प्रसंगाधान दाखवत लागलीच या कुटुंबाने व इतर सोसायटी सदस्यांनी बाहेर धाव घेत अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलवलं आणि अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू झाले. परिणामी या घटनेत संपूर्ण दोन्ही प्लॅट व त्यातील सामान जळून खाक झाले मात्र नशीब बलवत्तर म्हणून कुठल्याही प्रकारची जीवित वा कोणीही यात जखमी झालेल नाही
तास दोन तासानंतर महापालिका अग्निशमन दलाने ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे . परंतु यातील त्या कुटुंबाची दोन्ही घरे संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
मागील दोन दिवसांपासून आग लागल्याच्या घटनाही वसईत सातत्याने घडत आहेत. तर दोन दिवसांपूर्वी मिरा रोड येथील गॅस सिलेंडर स्फोट व गुरुवारी पुन्हा मुंबई त ही गॅस चा स्फोट झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे घरात दिवा ,धूप ,अगरबत्ती आदी व गॅस लावताना वावरताना संपूर्ण खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे.