वाडा : तालुक्यातील शेकडो एकर भातपिकांवर तुरतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातशेती संकटात आली आहे. महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस पडल्याने भातशेती चांगली होईल असा विश्वास शेतकºयांना होता. मात्र हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकावर गेल्या पंधरा दिवसापासून तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे देवघर, बुधावली, कळंभे, सोनाळा, मोज, शिरसाड, बिलावली, खरीवली आदी गावातील भातशेतीचे अक्षरश: वाटोळे होण्याच्या मार्गावर आहे. कीटकनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय या भीतीने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.पंचायत समितीच्या कृषी विभागाने शेतकºयांसाठी शंभर टक्के अनुदानावर कीटकनाशकेउपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकर नेते प्रफुल्ल पाटील यांनी प्रशासनाकडे केली असून पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडे भरपाई साठी प्रकरण द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
वाड्यातील शेकडो एकर भातशेतीवर तुरतुड्या रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:27 AM