शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

शेकडो इमारती तहानलेल्या! पालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 11:41 PM

नालासोपारावासीयांना घ्यावे लागते विकतचे पाणी : पालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा नाही

मंगेश कराळे 

नालासोपारा : वसई-विरार शहर महापालिकेकडून मुबलक पाणी असल्याचा दावा केला जात असताना नालासोपारा परिसरातील शेकडो इमारती आजही तहानलेल्या आहेत. पाण्यासाठी त्यांना महिन्याला हजारो रुपये खर्च करून आपली तहान भागवावी लागत आहे. विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने या परिसरात टँकरमाफियाही आपले पाय रोवत आहेत. या परिसरात पाण्यासाठी टँकर माफिया एका टँकरला एक हजार रुपये ते बाराशे रुपये आकारतात.

नालासोपारातील पूर्व आणि पश्चिमेकडील परिसरात शेकडो इमारती गेल्या १० ते १२ वर्षांत उभ्या राहिल्या आहेत. या इमारती वसवताना महापालिकेने कानाडोळा केला. आता या इमारतींमध्ये लाखो रुपये खर्च करून अनेकांनी घरे घेतली, तर महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन विकासकांनी दिले. पण आता अनेक वर्षांचा काळ उलटला; परंतु अनेक इमारतीला महापालिकेची नळजोडणी मिळालेली नाही. उलट त्यांना टँकरने पाणीपुरवठा करून विकासक आणि टँकरमाफिया यांनी मोठी माया जमवली आहे.वसई आणि विरार शहरापेक्षा नालासोपारा शहरातील मतदारांची संख्या जास्त आहे. पण प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाण्याचे आश्वासन देऊन मते पदरात पडून घेण्याचे काम राजकीय पुढारी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पाण्यावरच राजकारण करीत सत्ताधारी पक्ष सत्ता गाजवत आहे. पूर्वेकडील परिसर अधिक लोकवस्तीचा असून येथील नागरिक आजही आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागवत आहेत. टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य नसल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न सतावत आहे. असे असतानाही महापालिका या नागरिकांना पाण्याची व्यवस्था करीत नाही. काही ठिकाणी सार्वजनिक पाण्याचे नळ आहेत, पण त्यांना पाणी येत नाही, अशी स्थिती आहे.पाण्याच्या बाबतीत कोणतेही राजकारण कुणी करू नये. नळ कनेक्शन देताना कोणी त्रास देत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल, तर रहिवाशांनी माझ्याशी किंवा आमदारांशी संपर्क साधावा. सर्वांना पाणी मिळावे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही गैरप्रकारांना थारादेणार नाही.- प्रवीण शेट्टी, महापौर,वसई-विरार महानगरपालिका 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार