वसई : वाहतूक पोलीस आणि आरटीओचे आर्थिक हितसंबंध जपणाºया रिक्षाचालकांनी आता मनमानी भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले आहे. भाडे परवडत नसेल तर रिक्षात बसू नका असा फलकच रिक्षा चालकांनी नायगावमध्ये लावला आहे. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादावादी होऊ लागली आहे.वसईतील रिक्षाचालक कोणतेही नियम पाळत नाहीत. एकही अधिकृत रिक्षा स्टँड नाही. अनधिकृत रिक्षांची संख्याही प्रचंड आहे. एका स्टँडवर एकावेळी असंख्य रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होत असते. त्यातच शेअर रिक्षाच्या नावाखाली पाच-पाच प्रवाशांची वाहतूक एकाच रिक्षातून केली जाते. त्याचबरोबर मनमानी भाडेही आकारले जात असल्याचे प्रकार अ़नेकदा घडले आहेत. मात्र, वाहतूक पोलीस आणि आरटीओशी आर्थिक हितसंबंध असल्याने रिक्षा चालकांची ही मनमानी आणि दादागिरी वाढू लागली आहे.नायगाव पश्चिमेला असाच नवा वाद रिक्षाचालकांनी उकरून काढला आहे. चालकांनी १५ सप्टेंबरपासून भाड्यात अचानक बेकायदेशीर वाढ केली आहे. याप्रकरणी प्रवाशांच्या तक्रारीवरून रिक्षाचालक, आरटीओ, पोलीस आणि प्रवाशांची बैठकही झाली. यात आरटीओने भाडेवाढ बेकायदेशीर ठरवत सर्वेक्षण होऊन भाडेदर निश्चित केले जातील. तोपर्यंत जुन्या दराने भाडे आकारा असे आदेश त्यावरून प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होऊ लागले आहेत.चालकांनी आरटीओचे आदेश धुडकावत वाढीव दरानुसार नुसार भाडे वसूली सुरु ठेवली आहे. वाढीव भाडे न देणाºया प्रवाशांवर रिक्षाचालक टोळीने दादागिरी करीत असून प्रसंगी धक्काबुकीही करीत आहेत. इतकेच नाही तर रिक्षाचालकांनी वाढीव दरानेच भाडे द्यावे लागेल. ज्यांना ते परवडत असेल. त्यांनी रिक्षात बसावे. ज्यांना परवडत नसेल त्यांनी रिक्षात बसू नये कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये, असे फर्मानच रिक्षा चालकांनी फलकाद्वारे सोडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार प्रवाशांनी आरटीओ आणि पोलिसांच्या नजरेस आणून दिल्यानंतरही त्यांनी कोणतेही कारवाई केलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी मनमानी भाडे आकारणी सुरुच ठेवून प्रवाशांना वेठीस धरले आहे. दरम्यान, रिक्शा चालकांच्या या दादागिरीविरोधात आता वसईतून प्रवाशांनी सह्यांची मोहिम सुरू केली आहे. तसेच ईमेल द्वारे रिक्षाचालकांविरोधात तक्रार केल्या जात आहेत.
भाडे मान्य नसेल तर रिक्षात बसू नका, दरवाढीला आरटीओने आक्षेप घेतल्यानंतरही रिक्षाचालकांची मनमानी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:49 AM