पालघर : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाविद्यालयात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचा सत्कार सोहळा व प्रकट मुलाखत या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात संस्थेचे अध्यक्ष अॅड. जी.डी. तिवारी यांच्या ‘माय कोट्स वीथ कलेक्शन आॅफ थॉटस’ या ग्रंथाचे प्रकाशन रामभाऊ नाईक यांच्या हस्ते झाले. कार्यक्र मादरम्यान सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान राम नाईक यांनी जोवर काम करीत राहता येईल तोवर माणसाने काम करीत राहीले पाहीजे असे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून अॅड्. जी.डी. तिवारी यांनी आपल्या ग्रंथाचे स्वरु प व संकल्पना सांगून रामभाऊ आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी यांच्यातील ऋणानुबंधाचा आवर्जून उल्लेख केला.मुलाखतीदरम्यान सुधीर गाडगीळ यांनी रामभाऊंच्या व्यक्तीमत्वातील अनेक पैलु उलगडून दाखिवले.उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाल्यानंतर प्रथमत: त्यांनी महामहीम म्हणू नये, असा आदेश काढला. उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जो चुकीचा उच्चार केला जात असे, त्यात सुधारणा घडवून आणली. उत्तर प्रदेशमध्ये उद्योगधंदे वाढावेत म्हणून इनव्हेस्टर समेट घडवून आणली. उत्तर प्रदेशमधील विविध निवडणूकांमध्ये जास्त मतदान होणाऱ्या केंद्राचे आणि कर्मचाºयांचे सत्कार केले. तुम्हाला झालेल्या कॅन्सरवर तुम्ही मात कशी केली? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना लोकांचे प्रेम, सुधारीत औषधे आणि मनोधैर्य या तीन कारणांमुळे मी या आजारावर मात करु शकलो असे ते म्हणाले.गोविंदाने केलेला पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘मै चुनाव हारा हु, मै हिंम्मत नही हारा हुं’ असे ते म्हणाले. या मुलाखतीच्या दरम्यान संसद भवनामध्ये राष्ट्रगीत व वंदे मातरम् म्हणण्याची प्रथा डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे पोस्टकार्ड, परमवीरचक्र विजेत्या सैनिकांचे स्मारक, गोराई मनोर येथे पाणी व्यवस्था या कार्यांचा त्यांनी उल्लेख केला. जगातील तीन देशांची लोकसंख्या उत्तर प्रदेशपेक्षा जास्त आहे.बावीस कोटी लोकसंख्या असलेल्या राज्याचा राज्यपाल होण्याचा सन्मान मला मिळाला हा असा विशेष उल्लेख त्यांनी या मुलाखतीदरम्यान केला.अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना व आता योगी आदित्यनाथ असताना आपणास काय फरक जाणवतो का? असा प्रश्न त्यांना गाडगीळ यांनी विचारला व या प्रश्नाला त्यांनी ‘दोन्ही सरकार माझीच आहेत, कारण मी राज्यपाल आहे असे खुबीने उत्तर दिले अखिलेश यादव यांनी कृष्ठरोग्यांना अडीच हजार मानधन देण्याचे केले. तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचा स्थापना दिन साजरा करण्याचे मान्य केले. उत्तर प्रदेशचा चेहरा आता बदलत आहे. तेथील एकूण पदवी घेणाºयांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत आहे, हे देशाच्या दृष्टीकोनातून चांगली गोष्ट आहे असेही रॅम नाईक यांनी म्हटले. प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी प्रास्ताविकातून सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्र मांचा आढावा घेतला.या कार्यक्र माचे सूत्रसंचालन लेफ्टनंट अनघा पाध्ये यांनी केले. कार्यक्र माचे आभार सचिव प्रा. अशोक ठाकूर यांनी केले. कार्यक्र माच्या आयोजनात पर्यवेक्षक प्रा. महेश देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्र मास विश्वस्त माणकताई पाटील, आर.एम. पाटील, लक्ष्मीकांत बाजपेई, उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर,कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर, पदाधिकारी, सदस्य,शिक्षक, विद्यार्थी व पालघर परिसरातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
जोवर करता येईल, तोवर काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:17 AM