शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

खूनप्रकरणी गुन्हा तर; मृताविरोधात विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:38 PM

कळमपेढी येथील आपल्या शेतात प्रभाकर म्हसकर आपल्या पत्नीसोबत रहात असून २ जानेवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ते झोपले असताना मृत उमतोल मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या झोपडीत शिरला.

पालघर : पडघा (कळमपेढी) येथील प्रभाकर म्हसकर (५५) याच्या घरात रात्री घुसून त्याच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिलीप उमतोल (३६) याच्या डोक्यात लाकडी दांडक्याचा फटका मारून त्याच्या मृत्यूला कारणीभूत झाल्या प्रकरणी म्हसकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.कळमपेढी येथील आपल्या शेतात प्रभाकर म्हसकर आपल्या पत्नीसोबत रहात असून २ जानेवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ते झोपले असताना मृत उमतोल मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या झोपडीत शिरला. त्याने झोपलेल्या म्हसकर याच्या पत्नीशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता तिने आपला बचाव करण्यासाठी आरडाओरड केली शेजारीच झोपलेल्या तिच्या पतीला आपल्या पत्नीच्या आवाजाने जाग आली. आपल्या पत्नीशी एक व्यक्ती झोम्बाझोम्बी करीत असल्याचे त्यांनी पाहिल्यावर शेजारीच असलेल्या चुलीतील दांडूका काढून त्याच्या डोक्यात हाणला. तो रक्तबंबाळ झाल्याने आरोपीच्या घरात तो जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पाड्यात सकाळी पसरली. त्याला उपचारासाठी प्रथम पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आल्या नंतर त्याला अधिक उपचाराची गरज असल्याने वलसाड येथील रु ग्णालयात नेण्यात आले.तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. या खुनाच्या प्रकरणी आरोपी प्रभाकर म्हसकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर मृत दिलीप उमतोल याच्या विरोधात आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्र ारी वरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी