शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

भूमिपुत्र कामगारांना कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 11:28 PM

केंद्रात एका मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे मागील चार वर्षांपासून काम करणा-या घिवली गावातील ७१ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू

बोईसर : तारापूर येथील भाभा अणू संशोधन केंद्रात एका मोठ्या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडे मागील चार वर्षांपासून काम करणा-या घिवली गावातील ७१ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.तारापूर येथे भाभा अणू संशोधन केंद्रात मागील चार वर्षांपासून इंटरग्रेटेड न्यूक्लियर रिसायकल प्लांट (आयपी) सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असून याकरिता सुमारे १२०० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. यामध्ये तारापूर बीएआरसी लगत असलेल्या घिवली गावातील प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित असे मिळून एकूण सुमारे २१० कंत्राटी कामगार मागील ४ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यापैकी ७१ कंत्राटी कामगारांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे.या घटनेनंतर घिवली गावातील भूमिपुत्र असलेल्या व एचसीसीमध्ये काम करणाºया सर्व कंत्राटी कामगारांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकाºयांकडेही बैठक झाली. खासदार राजेंद्र गावित यांनी बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्या कार्यालयात हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी संतोष कुमार व संजय गोरे यांच्यासोबत बैठक घेतली. या वेळी तारापूर पोलीस स्थानकाचे स. पोलीस निरीक्षक जाधव, शिवसेनेचे पालघर विधानसभेचे संघटक वैभव संखे, शिवसेनेचे देवा मेहेर व काही सेना पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी खा. गावितांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाºयांना तुम्ही असे कुठल्याही कामगारांना कामावरून काढू शकत नाही, असे सांगून अकुशल कामगारांना सुधारण्याची संधी द्या व संधी देऊनही सुधारत नसतील तर काढून टाका, जर संधी दिली गेली नाही तर प्रोजेक्ट बंद करून जावे लागेल, असा इशारा गावित यांनी दिला. तडकाफडकी काढलेले हे कामगार ४ वर्ष लायक होते का? असे गावितांनी विचारून आपणाला हा प्रश्न सोडवायचा आहे की रेंगाळत ठेवायचा आहे, असा प्रश्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, असे सांगितले. मालकाला बैठकीला बोलवा, अशी मागणी गावितांनी अधिकाºयांकडे करताच ते बैठकीला येऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगताच या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने चर्चा करण्यासाठी मालकाला यावेच लागेल, असे खडसावून सांगितले.>बीएआरसीमध्ये कोणत्याही कंत्राटदाराकडे काम करणाºया कामगारांचे पास जर जमा करायचे असतील तर ते पास प्रथम कंत्राटदार कंपनीने स्वत:कडे घेऊन बीएआरसी प्रशासनाच्या मान्यतेनंतर सीआयएसएफकडे रद्द करण्यासाठी देणे आवश्यक आहे असा नियम आहे, परंतु या प्रकरणात सीआयएसएफने परस्पर आपल्या हातात कामगारांची यादी घेऊन सकाळी कामावर जात असताना कामगारांकडून गेटपास जबरदस्तीने घेतले हे अन्यायकारक आहे. - वैभव मोरे, उपसरपंच, घिवली