शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
3
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
4
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
5
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
6
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
7
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
8
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
9
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
10
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
11
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
12
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
13
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
14
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
15
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
16
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
17
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
18
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
19
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
20
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते

निरी-आयआयटीच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने वसई तुंबली! निधीअभावी चार वर्षांपासून अहवालाची अंमलबजावणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 6:33 AM

मागील तीन-चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे २०१८ नंतर पुन्हा वसई-विरार शहरांत पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

जगदीश भोवड, लोकमत न्यूज नेटवर्क 

वसई : मागील तीन-चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे २०१८ नंतर पुन्हा वसई-विरार शहरांत पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. २०१८ च्या पूरस्थितीनंतर महापालिकेने निरी-आयआयटी या संस्थांच्या मदतीने शहरांतील पूरस्थितीचा अभ्यास केला होता. मात्र, या संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार, महापालिकेने शहरात कामे केल्याचे दिसून येत नाही.

अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने वसई महापालिकेत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र आहे.  महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या संस्थांची मिळून सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती. मागील काही वर्षांत विरार पश्चिमेकडील हरित पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे.

विहिरी, बावखळे यांसारखे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवण्यात आले. सागरी नियंत्रण क्षेत्र, पाणथळ जागा व कांदळवने नष्ट झाली. या संरक्षित जागांवर मोठ्या प्रमाणात मातीभराव झालेला आहे, याचे परिणाम पावसाचे पाणी समुद्रात जाऊन मिळण्याचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तुंगारेश्वर हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झालेले असतानाही त्याचे संरक्षण करण्यात वनविभागाला यश आलेले नाही.निरी-आयआयटीचे चार अहवाल प्राप्त झाले आहेत. ही कामे करण्यासाठी किमान ३०० कोटींची गरज आहे. महापालिकेने ११७.१९ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. मात्र तरीदेखील सध्या जी स्थिती उद्भवत आहे, ती पाहता आपल्याला आवश्यक ती कामे प्राधान्याने करावी लागणार आहेत.    

- अनिलकुमार पवार, महापालिका आयुक्त 

काय म्हटले आहे ‘या’ अहवालात?

    पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी धारण तलाव (होल्डिंग पॉन्ड्स) विकसित करणे.    शहराचे नियोजन करावे तसेच नैसर्गिक पाणी जाण्याच्या मार्गातील अतिक्रमण बाजूला करून मार्ग मोकळे करावेत.    पावसाचे पाणी जाण्याच्या मार्गांची विकास आराखड्यात नोंद करून त्याच्या आजूबाजूला कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये.    मोकळ्या जागेच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाणारे पुराचे सर्व पाणी तलावात वळवणे आणि ‘रेन हार्वेस्टिंग’ प्रकल्पही राबवणे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfloodपूरRainपाऊस