रविंद्र साळवेमोखाडा : मुलांना प्राथमिक शिक्षणाची तोंड ओळख व्हावी व त्याची गोडी निर्माण व्हावी, या करीता शासनाने अंगणवाड्या सुरु केल्या. त्यांना आता ३० हून अधिक वर्षे झालीत. अंगणवाडीमुळे प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण देखील वाढले मात्र गेल्या काही वर्षात या शिक्षणाचा दर्जा घसरून अंगणवाडीतून ते अदृश्य होते आहे. कारण शासनाच्या उदात्त हेतूला स्थानिक प्रशासन बासनात गुंडाळत ठेवत आहे. परिणामी अंगणवाड्यांचा बोजवारा उडाला आहे.मोखाड्यात १७१ मूळ व ५१ मिनी अंगणवाड्या असून त्यातील मुलांची संख्या हाजारोंनी आहे परंतु बºयाच अंगणवाड्यामध्ये मुलांना दिली जाणारी खेळणी, शिक्षण विषयक साहित्य नाही.खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी मुलांकडून हजेरी लावली जाते अंगणवाड्यामधून मुलांना अल्पोपहार म्हणून खाऊ दिला जातो मुलांना प्राथमिक शिक्षणा बरोबर पौष्टिक आहार मिळावा असा त्या मागचा उद्देश आहे. परंतु सध्याच्या स्थितीला अंगणवाडया या फक्त खाऊ वाटपाचे ठिकाण बनले आहे. मुलांची हजेरी ही फक्त खाऊ घेण्यासाठी लावली जाते यामुळे शिक्षणाच्या मूळ हेतूलाच दुर्लक्षिले जाते आहे.शहरामध्ये महानगरामधील मुलांना नर्सरी सारख्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय आहे परंतु ग्रामीण भागातील मुलांना अशा शिक्षणाचे पर्याय नाहीत व असले तरी त्यांचा वापर करण्याची कुवतही नाही यामुळे येथील आदिवासी मुलांना अंगणवाड्या हेच साधन आहे. परंतु तालुक्यातील अंगणवाडयांची स्थिती पाहता पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या नावाने पुर्णत: बोंब आहे. याबाबत अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी लुंगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.>कर्मचाºयांची होते अक्षम्य हेळसांडबालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका ही महत्वाची असतांनाही आजही तालुक्यातील अनेक अंगणवाड्या भकास आहेत कुठे इमारत तर कुठे पेयजल सुविधा तर कुठे शौचालय नाही.त्याचबरोबर अंगणवाड्या कर्मचाºयांच्या मानधानाची परवड कायमची आहे. वेळेवर पगारच होत नाही तसेच पौष्टिक आहारासाठी खरेदी केलेल्या मालाची बिलेही वेळेवर काढली जात नाहीत. याचा विपरीत परिणाम अंगणवाडीतील शिक्षणावर होत आहे.
अंगणवाड्यात शिक्षण दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:06 AM