शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

बेकायदा होर्डिंग्जचा पालघरमध्ये सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:45 AM

दुकानदार, वाहनचालकांना हाेत आहे त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर नगर परिषदेने  खाजगी जागेत आपले बेकायदा होर्डिंग्ज लावल्याने हजारो रुपये भाडे भरणाऱ्या दुकानदारांचा व्यवसाय ठप्प पडण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पालघर शहरात बेकायदा आणि विनापरवाना होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला असून रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पथदिव्यांच्या खांबावर लटकत असलेल्या होर्डिंग्जचा मोठा फटका वाहनचालकांना बसला आहे. ज्याला हव्या त्या पद्धतीने हव्या त्या ठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज लावले जात असून एका मॉलच्या शुभारंभाचे बॅनर शहरातील सर्व रस्त्यावर लावले होते. यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्या बेकादा बॅनरवर कारवाईचे सत्र नगर परिषदेने सुरू केले आहे.

माहीम रस्त्यावरील ठाणे जिल्हा समाज संघाच्या इमारतीखाली असलेल्या साडी सेंटर आणि अन्य कपड्याच्या दुकानदारांनी  दुकानांसमोर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्प्ले  लावले आहेत., मात्र पालघर नगर परिषदेने ठाणे जिल्हा समाज संघाची कुठलीही परवानगी न घेता त्यांच्या प्रवेशद्वाराजवळील लोखंडी कठड्याला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धा आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ चे दोन भले मोठे होर्डिंग्ज काही दिवसांपासून लावून ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या ग्राहकांना आमची दुकानेच दिसत नसल्याने आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे दुकानदारांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांनी तत्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देत बेकायदा लावलेले होर्डिंग्ज काढून टाकावेत, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

अशी बॅनर लावली असतील तर ती काढण्यासाठी मी कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत.- स्वाती देशपांडे, मुख्याधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर