शौकत शेखडहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गावरील घोडबंदर ते तलासरीच्या अच्छाड पर्यंतचा ११० कि.मी. चा पट्टा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत असून हायवेवर फिरणारी मोकाट गुरे, हायवेच्या कडेला होणारे अवजड वाहनांचे अवैध पार्र्किंग तसेच चारोटी ते मनोर, चारोटी ते अच्छाड पर्यंत विरोधी दिशेने येणारी मोटारसायकल, रिक्षा आदी त्यास कारणीभूत ठरत आहे. ज्या महामार्ग पोलीसांवर येथील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने सध्या तलासरी ते मनोर पर्यंतच्या हायवेवर अनेक अपघात होत आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या चारोटी, महालक्ष्मी, धनोरी, धुंदलवाडी, आंबोली, ओसरविरा, दापचरी, तलासरी, मेंढवण येथील हायवेच्या कडेला मुंबई तसेच अहमदाबादकडे जाणाºया हायवेवर शेकडो अवजड वाहने अवैधरित्या उभी असतात. शिवाय महामार्गालगत असलेल्या गाव, खेडोपाडयात जाण्यासाठी असलेल्या सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांची बेकायदेशीर पार्र्किंग होत असल्याने पादचारी तसेच स्थानिक वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे हायवे तसेच सर्व्हिस रोडला अवजड वाहनचालक वाहन पार्क करून येथील हॉटेल तसेच ढाब्यावर अंघोळ, जेवण तसेच झोप काढण्यासाठी जात असल्याने भरधाव येणाºया वाहनचालकांचे लक्ष या वाहनांकडे न गेल्यास अपघात घडत आहेत. तर मुंबई-अहमदाबाद हायवेच्या दोन्ही बाजूला अनेक गाव, खेड, पाडे आहेत. दिवसभर येथील स्थानिक नागरिक , व्यवसायानिमित्त बाहेर जात असतात. परंतु एका बाजूकडून दुसºया बाजूकडे जाण्यासाठी ओव्हरब्रिज किंवा अनेक कि.मी. पर्यंत रस्ता न ठेवल्याने दिवसभर असंख्य वाहने उलट दिशेने येत असतांना अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कासा पोलीसांच्या हद्दीतील मेंढवण, मनोरगेट, धुंदलवाडी पर्यंत ३४ कि.मी. ची हद्द असून गेल्या वर्षभरात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर किरकोळ व गंभीर असे एकूण १२० अपघात झाले असून त्यामध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान नुकतेच मुंबई-हायवे वरील आंबोली येथे बैल आडवे आल्याने घडलेल्या अपघातात दोन जणांचा बळी गेला. तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चौपदरीकरण तसेच अर्धवट कामे वाहनचालकांच्या जीवावर बेतू लागली आहेत. चारोटी महामार्गाच्या पोलीसांची हद्द मेंढवण ते धुंदलवाडी पर्यंत (३४ कि.मी.) आहे. परंतु त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात पोलीस बळ तसेच वाहने नसल्याने अनेक अडचणी येत असतात. असे वाहतूक पोलीसांचे म्हणणे आहे. शिवाय अनेक महिन्यांपासून प्रभारी असून कायमस्वरूपी अधिकारी मिळत नाही अशी तक्रार आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवर असंख्य वाहन चालकांकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन होत असून हायवे, सर्व्हिसरोड तसेच विरोधी दिशेने येणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हायवेवर अवजड वाहनांचे अवैध पार्र्किं ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:58 PM