वसई : वसई-विरार महापालिकेच्या गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रो-रो सेवा, वस्तूसंग्रहालय, बहुमजली वाहनतळ आदी योजना आता साकारणार आहेत. तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे या योजना रखडल्या होत्या. त्या आता अंतिम टप्प्यात असून या वर्षांत त्या पूर्ण होतील, असा दावा महापालिकेने केला आहे.शहराच्या विकासासाठी महापालिकेने अनेक योजना आखल्या होत्या. मागील सात वर्षांपासून या सर्व योजना आणि निर्णय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात येत होते. त्यासाठी तरतूद करण्यात येत होती. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व योजना आतापर्यंत कागदावरच राहिल्या आहेत. त्यांची पूर्तता झालेली नाही, प्रकल्प कार्यान्वित झालेले नाहीत. महापालिकेने मात्र, या तांत्रिक अडचणींमुळे या योजनांची पूर्तता यापूर्वी झाली नसल्याचे सांगितले आहे.योजनांचा आराखडा तयार आहे. त्यामुळे त्याची तरतूद आम्ही अर्थसंकल्पात केली होती. रो रो सेवा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्याला सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र कायद्याची अडचण आली होती. त्यामुळे तो रखडला होता. आता त्याच्या अटी शिथिल झाल्याने तो प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे, असे स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी सांगितले.वसईतील सर्व समाजाच्या पारंपारिक वस्तू, अवजारे, वसईच्या संस्कृतीचे अवशेष संग्रहित करण्यात आले असून त्याचे वस्तुसंग्रहालय केले जाणार आहे.बहुमजली वाहनतळासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्पही या वर्षांत कार्यान्वित होणार आहे. मोबाइल मनोऱ्याचे धोरण राबवण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. सर्व मनोऱ्यांचे सर्वेक्षण झाले असून त्यांना शास्तीसह शुल्क आकारले जाणार आहे.लवकरच ही प्रक्रि या सुरू केली जाणार आहे, अशी माहिती सुदेश चौधरी यांनी दिली. शहरातील सर्व निवासी आणि वाणिज्य विषयक इमारतींचे लेखापरीक्षण करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. यासाठी नोटिस बजावण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने लोकमतला सांगितले.>रखडलेल्या योजना....रो रो सेवा, पक्षी- प्राणी व औषधी वनस्पतींचा समावेश असेलेल निसर्ग उद्यान, वसईचा पुरातनआणि पारंपरिक ठेवा जतन करणारे वस्तूसंग्रहालय, बहुजमजली स्वयंचलित वाहनतळ, स्कायवॉकला जिने, सर्व सरकारी आस्थापनांचे लेखापरीक्षण, शैक्षणिक संस्था, शॉपिंग मॉल, वाणिज्यविषयक आस्थापनांचे लेखापरीक्षण, मोबाइल मनोऱ्यांविषयी धोरण आखले जाईल.>योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आधी तरतूद करावी लागते. ती आम्ही केली. अनेक योजनात तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी येत होत्या. त्या दूर झाल्याने आता मार्गी लागत आहे. आगामी आर्थिक वर्षांत नागरिकांना या योजना पूर्ण होतील- सुदेश चौधरी, सभापती, स्थायी समितीमहापालिकेच्या अर्थसंकल्पात वसई-विरार शहरातील विविध प्रकल्पांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार त्या त्या विभागासाठी नेमलेले अधिकारी अंमलबजावणी करीत असतात. हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील.- किशोर गवस, उपायुक्त, महापालिका
रो रो सह योजना साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:40 PM