शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

भाईंदरमध्ये गणपतीची वर्गणी चोरली, पावतीपुस्तकासह कागदपत्रेही नेली

By धीरज परब | Published: September 08, 2022 6:58 PM

६ सप्टेंबर रोजी इमारतीच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेण्यासाठी ते गेले असता डिकी तोडलेली व पेट्रोल टाकण्याच्या टाकीचे झाकण उघडे दिसले.

मीरारोड - सार्वजनिक गणपती मंडळाची जमलेली वर्गणी दुचाकीची डिक्कीमधून चोरण्यात आल्याची घटना भाईंदरच्या इंद्रलोक भागात घडली आहे. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक नाका भागात युथ पँथर मित्र मंडळ आहे. मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो . मंडळाचे खजिनदार अभिषेक राय (२७) रा. चंदनपार्क , भाईंदर पूर्व यांनी मंडळाची जमलेली ८ हजार रुपयांची वर्गणी, पावती पुस्तक आदी त्यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवले होते.

६ सप्टेंबर रोजी इमारतीच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेण्यासाठी ते गेले असता डिकी तोडलेली व पेट्रोल टाकण्याच्या टाकीचे झाकण उघडे दिसले. डिक्कीत तपासले असता वर्गणीची ८ हजार रोख , पावती पुस्तक व दुचाकीची कागदपत्रे चोरीला गेलेले होते. ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री अभिषेक यांच्या फिर्यादी नंतर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस तपास करत आहेत . 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवCrime Newsगुन्हेगारीThiefचोर