मीरारोड - मीरा भाईंदर मधील १७ गुंडाना पोलिसांनी गेल्या अडीज वर्षात हद्दपार केले आहे. त्यामध्ये पटेल टोळीतील दोघांचा समावेश आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय झाल्याने आता समाजाला घातक आणि सराईत गुंडाना हद्दपार करण्याचे अधिकारी पोलीस आयुक्ताल्याच्या अखत्यारीत आले आहेत. २०२३ सालात पोलिसांनी मीरा भाईंदर मधील १७ जणांचे हद्दपारीची प्रस्ताव तयार केले होते. त्या पैकी आता पर्यंत ११ जणांना हद्दपार केले गेले आहे. त्यामध्ये काशीमीराच्या कुख्यात पटेल टोळीच्या गुलशन तासे व बिलाल पटेल यांच्या वर प्रत्येकी २ वर्षांची हद्दपारीची कारवाई केली गेली आहे.
या शिवाय चालू वर्षात शोएब खान, गोलू उर्फ रमन सागर शर्मा, आयुब रहमान खान व तन्वीर परवेज खान या चौघांना देखील २ वर्षां साठी हद्दपार केले गेले आहे. सुदर्शन बिभीषण खंदारे आणि अतिरेक राजकुमार शर्मा यांना प्रत्येकी १ वर्षा साठी; अल्ताफ आलम हाश्मी, दीपक मुरारीसिंग ठाकूर व पेशनवाज उर्फ सोनू असगर खान यांना ६ महिन्यांसाठी तर विशाल सुभाष गुप्ता याच्यावर ३ महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केली गेली.
२०२२ मध्ये राजेश उर्फ राजू जॉन कोळी, जरियाब जलील सय्यद व सुलेमान सैफुल्ला चौधरी यांना २ वर्षां करीता तर परवेश उर्फ पवन उर्फ भोंगा वीरेंद्र पाटील वर ३ महिन्या करीता हद्दपारीची कारवाई केली गेली. चालू वर्षात ६ महिन्या करता हद्दपार केलेल्या पेशनवाज खान याला २०२२ मध्ये सुद्धा ६ महिन्या करता हद्दपार केले गेले होते. २०२१ मध्ये अमीन उर्फ निलबाबू कुट्टी याला ६ महिन्यां साठी हद्दपार करण्यात आले होते.
भविष्यात होणाऱ्या पालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुका पाहता हद्दपारीची कारवाई राजकीय गुंडांवर केली जाणार का ? या कडे देखील नागरिकांचे लक्ष लागून आहे.