शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

अपघातात तरुणाच्या शरीराचे झाले दोन तुकडे, मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीस्वाराला उडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 9:37 PM

Accident: ३७ वर्षीय दुचाकीस्वाराला गुरुवारी दुपारी मनपाच्या कचरा गाडीने उडवल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक  घटना घडली आहे

- मंगेश कराळे नालासोपारा - ३७ वर्षीय दुचाकीस्वाराला गुरुवारी दुपारी मनपाच्या कचरा गाडीने उडवल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. वालीव पोलिसांनी कचरा गाडीवरील आरोपी चालकाच्या विरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करून तपास करत आहे.

राजावली परिसरात राहणारे राजेश शंकर मोर (३७) हे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीने चिंचोटीवरून राजवली येथील घरी येत होते. अग्रवाल नाक्याजवळ रेंज ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिरुपती इंडस्ट्रीच्या गेट समोर वसई विरार मनपाच्या कचरा गाडीवरील (क्रमांक एम एच ४८ सी बी ०१२०) चालकाने ताब्यातील वाहन अविचाराने, हयगईने व वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालविल्यामुळे दुचाकीला जोरदार ठोकर मारली. या अपघातात राजेश यांच्या पोटाचा चेंदामेंदा होऊन शरीराचे दोन तुकडे झाले. तसेच अतिरक्तस्त्राव झाल्याने घटनास्थळी मृत्यू झाला आहे. त्यांचे भाऊ हरेश्वर मोर (३९) यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

टॅग्स :AccidentअपघातVasai Virarवसई विरार