मनोर : गुढी पाडवाच्या शुभमुहूर्तावर आदिवासी एकता मित्रमंडळा तर्फे दैनंदिन जीवनात लागणारे दस्तऐवज व विविध योजनांची माहिती देणाऱ्या लोक सेवा केंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती वंदना वाघात हिच्या हस्ते येथे करण्यात आले त्या वेळी माजी राज्य मंत्री राजेंद्र, गावित, अर्चना वाणी भाजप महाराष्ट्र सचिव, वसंत चव्हाण शिवसेना जिल्हा उपप्रमुख, रुफी भुरे अध्यक्ष काँग्रेस, राधेशाम चौधरी दिलीप देसाई, दत्ताजी चांपणेकर, माधव पाडोसा व संतोष जनाठे आदी मान्यवर उपस्थित होते.आज मनोर ग्रामपंचायतीच्या मागे लोकसेवा केंद्र स्थापन केले त्याचे मुख्य उद्देश बँक स्लीप भरणे, विविध सरकारी दाखले काढून देणे, विविध प्रकारचे अर्ज भरून देणे. तसेच ग्रामविकासाला चालना देणारी अनेक कामे विना शुल्क या केंद्रात करण्यात येणार आहेत. यावेळी वसंत चौहान यांनी अकरा हजार रुपयांची रोख मदत केली तर रूफी भुरे यांनी केंद्रासाठी टेबल खुर्ची भेट दिली या वेळी मनोर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र सरपंच जागृती हेमाडे व उप सरपंच साजिद खतीब कार्यक्र माचे ठिकाणी उपस्थित नसल्याने लोकांमध्ये कुजबुज सुरु होती या वेळी नारायण भुयाल, शंकर खनडेकर, कुमावत सर, सुनीता म्हसकर, गणेश घोलप, सुनील लोखनडे, कविता पाडवी, दीपिका जैन ग्रा प सदस्य राधेशाम चौधरी सुमती जैन, मनोज भानुशाली, आदींना मंडळा तर्फे गुलाब देऊन स्वागत केले सूत्रसंचालन सुनील किरकिरा यांनी केले. (वार्ताहर)कामे होणार मोफतमनोर परिसरातील पन्नास ते साठ गावातील लोकांना या लोक सेवा केंद्राचा उपयोग होणार कारण अनेक ठिकाणी पैसे घेऊन कामे केली जातात त्यास आळा बसविण्यासाठी या केंद्राची स्थापना केली असे मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी सांगितले.
लोकसेवा केंद्राचे उद्घाटन
By admin | Published: March 29, 2017 4:49 AM