वाडा : शेतमालाला दीडपट हमीभाव देऊन शेतकरी आत्महत्या रोखू असे म्हणत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकºयांची फसवणूक केली असून या सरकारच्या काळात भ्रमनिरास झालेल्या शेतकºयांच्या आत्महत्यांत वाढ झाली असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वाडा येथे केली.
भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेतकरी पाटील यांची विशेष उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी उत्पादन करण्यात कुठेही कमी पडला आहे. शेतीकरीता आलेले नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करत शेतकºयांनी शेतीचे उत्पादन वाढविले. आज कुठेही भूकबळी पडत नाहीत मात्र शेतकरी आत्महत्या करू लागलेत याला आजवरच्या सरकारांची ध्येयधोरणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
गत कॉंग्रेस सरकारच्या काळात आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या होत होती. मात्र भरमसाठ अश्वासने देवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात हे प्रमाण दोन तासावर आल्याने हे चित्र भयावह असल्याने केवळ कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजप आणि भाजपला पर्याय म्हणून कॉंग्रेस अशी निवड करणे धोकादायक ठरले आहे. त्यामुळे येत्या काळात गरीबांचे - शेतकरी- कष्टकरी वर्गाचे सरकार सत्तेवर यावे म्हणून व्यापक प्रबोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. आजवरच्या सरकारांनी शहरांमध्ये स्वस्त मजूर हवेत म्हणून शेतकºयांच्या विरोधात धोरणे राबविल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. या मारक धोरणाविरोधात सर्व शोषित समाजाने उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असे म्हणत भाजप सरकारच्या ध्येयधोरणांवर जोरदार टीका पाटील यांनी यावेळी केली. तर देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजप सरकार गरिबांच्या विरोधात आहे.
मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी शेतकरी कष्टकरी वर्गाला संकटात टाकले असून वाढत्या महागाईने हा वर्ग त्रस्त बनला आहे. या सरकारच्या काळात सर्वच समाजघटक अडचणीत आले असून देशाचा मूळ आधार असलेली लोकशाही धोक्यात आल्याची टीका भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे केंद्रीय समतिी सदस्य राजेंद्र परांजपे यांनी यावेळी केली.
यावेळी पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, बुलेट ट्रेनसह विविध लादलेले प्रकल्प रद्द करावेत, सिक्शनच्या जमिनी शेतकºयांना परत करा, फॉरेस्ट प्लॉट कसणाºया शेतकऱ्यांच्या नावे करा, ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा द्या यासह अन्य मागण्या करणारे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले.
या मोर्चात कॉ. बळीराम चौधरी, संज्योत राऊत, कमा टबाले, लहानू डावरे, रामचंद्र गिंभल, काळूराम लोखंडे, मोहन बोरसे, विष्णू पाडवी, शंकर भोईर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.