पालघर : वाढवण, जिंदाल बंदरा बद्दलच्या माझ्या भूमिके बाबत विचारणा होत असताना मी काल ही लोकांबरोबर होतो, आजही आहे आणि उद्याही त्यांच्या सोबतच राहील असे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्ह्यातील मच्छीमाराच्या समस्यांविषयी कार्यक्र मात आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.
जिल्ह्यातील वसई ते झाई- बोर्डी दरम्यानच्या मच्छीमारांच्या प्रलंबित समस्या आणि उपाययोजना या बाबत मच्छीमार प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठकीचे आयोजन गुरु वारी पालघरच्या ठाणे जिल्हा समाज संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, समाज संघाच्या अध्यक्षा ज्योती मेहेर, ठाणे मच्छीमार संघ अध्यक्ष जयकुमार भाय, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर, राजन मेहेर, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त राजेंद्र जाधव, मेरिटाईम बोर्डाचे उपअभियंते मेटकर, सहा. आयुक्त दिनेश पाटील, पतन विभागाचे अभियंते चौरे आदी अधिकाऱ्या सोबत विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
किनारपट्टीवरील ११२ किमीच्या क्षेत्रात राहणाºया अनेक घरांना यावेळी समुद्राच्या महाकाय लाटांनी दिलेल्या धडकेत मच्छीमारांचे, शेतकºयांच्या जमिनीचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हे रोखण्यासाठी मंजूर झालेले १३ धूपप्रतिबंधक बंधाºयाची कामे हरित लवादात दाखल याचिकेमुळे सुरू झालेली नाहीत त्याचे मोठे पडसाद बैठकीत उमटले. गावितांनी आपल्या समस्या नोंदविण्यात आल्या असून त्यावर संबंधित अधिकाºयांकडून उत्तर मागवून त्याची फाईल लवकरच मुख्यमंत्र्याच्या दालनात ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. दांडी-नवापूर पूल, खारेकुरण-मुरबे पूलासाठी ४७ कोटींची मागणी आपण केंद्राकडे केल्याची माहिती त्यांची यावेळी उपस्थितांना दिली.मच्छीमारांची टीका...च्चिंचणी, डहाणू, नवापूर, मुरबे , दांडी, वडराई, घिवली या गावातून धूप प्रतिबंधक बंधारा, जेट्टी, मच्छी मार्केट, खाडीत साचलेला गाळ, किनाºयावरील जागा नावावर करणे, दीपगृह, आदी समस्या मांडण्यात आल्या. सातपाटीमधील दोन्ही संस्थांचा डिझेल वरील कोट्यवधी रुपयांचा परतावा मत्स्यव्यवसाय विभागातील काही अधिकाºयांनी अडवून ठेवल्याची टिका मच्छीमारांनी केली.