वसई : स्वातंत्र्यपूर्व काळापासून धोकादायक बोटीवर अवलंबून असणाऱ्या पाणजुकरांना स्वतंत्र पुल मिळणार असल्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा पूल एमएमआरडीए बांधणार असून त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भार्इंदर आणि नायगांव या रेल्वे स्थानक आणि खाडीवरील पुलाच्या मध्ये चारही बाजुंनी पाण्याने वेढलेले पाणजु हे गांव आहे. या गावात जाण्यासाठी खाडीपुलावरून कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत जावे लागते.किंवा नायगांवच्या किनाऱ्यावरून बोटीने गाव गाठावे लागते. बोटीच्या या धोकादायक प्रवासात अनेकदा अपघातही घडले आहेत. तसेच रात्री ८ नंतर बोटी बंद होत असल्यामुळे कित्येक ग्रामस्थांना अंधारात रेल्वे पुलावरून मार्गक्रमण करावे लागते.अथवा रात्र फलाटावर काढावी लागत आहे.त्यामुळे पाणजु ते नायगांव असा सागरी पुल तयार करण्यात यावा.अशी मागणी करण्यात येत होती. पावसाळ्यात उधाण आणि मोठाल्या लाटा उसळत असल्याने गावाबाहेर पडणे गावकऱ्यांना अशक्य होऊन बसते. विशेषत: त्याचा त्रास विद्यार्थी, नोकरदार आणि आजारी माणसाला सहन करावा लागत आहे. एमएमआरडीए दोन्ही खाडीवर पूल बांधणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया देखिल सुुरु करण्यात आली आहे. याआधी रेल्वेच्या जुन्या पूलाची दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी त्याचा वापर करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेने पूल जुना झाल्याने धोकादायक आहे. त्यामुळे त्यावरून हल्नया वाहनांसाठी देखिल वाहतूक सुरु करता येणार नाही. असा अहवाल देऊन पूल मोडित काढण्याची शिफारस रेल्वेला केली होती. त्यानंतर रेल्वेने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारून जुना पूल मोडीत काढण्याचे कामही सुुरु केले होते. (प्रतिनिधी)
पाणजुकरांना मिळणार स्वतंत्र पूल
By admin | Published: February 20, 2017 5:19 AM