वाडा : तालुक्यातील नाणे येथे भूकंपग्रस्त पथकाने अचानक पहाणी करून यंत्रणा जमिनीत पुरल्याने नागरिक भयभीत झाले होते. येथील एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात भूकंप तपासणी मशीन आणून जागा खोदून ठेवली.चारही बाजूने मशीन लावायची लाईन जोडून ५० ते ६० फुटांवर जमिनीत ठेवले. याची माहिती गावातील कुणालाच नसल्याने शिवाय तालुका प्रशासनालाही माहीत नसल्याने गावातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दक्ष नागरिक रवींद्र घरत यांनी संपर्क साधून हे भूकंप यंत्र असल्याची माहिती मिळवून नागरिकांना सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
भूकंपग्रस्त पथकाची वाडा तालुक्यातील नाणे येथे पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:17 PM