पालघर : गुजरातकडून पालघर रेल्वे स्टेशनला येणारी सौराष्ट्र जनता एक्सप्रेस ही गाडी सायडिंगला येणार म्हणून बाजूच्या ट्रॅकवर गाडीची वाट पाहणा-या तीन व्यक्तींना गुरुवारी भरधाव इंटरसिटी एक्सप्रेसने चिरडले. या पैकी दोघांचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेमध्ये सापडला असून अन्य तिसºयाचा शोध सुरू आहे.पालघर येथे सौराष्ट्र जनता एक्सप्रेस ही गाडी फलाट क्र मांक ३ वर (सायडिंग ट्रॅक) येणार अशी उद्घोषणा करण्यात आल्याने ही गाडी सायडिंग ला धीम्या गतीने जाताना ती पकडण्यासाठी तिघे रेल्वे पॉवर स्टेशन जवळ २ नंबर ट्रॅक वर बसून होते. मात्र रेल्वे कंट्रोल ने हा प्लॅन बदलून सौराष्ट्र जनता फलाट १ वर आणण्याचा निर्णय घेतला. आपण पकडणार असलेली गाडी फलाट ३ च्या लूप लाइन मध्ये शिरे पर्यंत समोरून गाडी येणार नाही. असा त्यांचा अंदाज होता व ते २ नंबरच्या लाईनवर बसून होते. दरम्यान, इंटर्सिटी एक्सप्रेस अचानक आल्याने बेसावध असलेल्या तिघांना आपला जीव गमवावा लागला. एक्स्प्रेसच्या लोको पायलाटने याची माहिती स्टेशन अधिक्षक कार्यालयाला दिली़
इंटरसिटी एक्स्प्रेसने तिघांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 4:39 AM