शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

चौकशीत अग्निशमन विभागाचे पितळ उघडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 12:52 AM

पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते आणि त्यांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीच आता हे ‘ऑडिट’ करण्याचे काम करावे, अशीही अपेक्षा वसई-विरारकर करीत आहेत.

आशिष राणे

वसई : विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाअंतर्गत गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या चौकशीत महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे आता वसई - विरार मनपाच्या अग्निशमन विभागाचेच ‘ऑडिट’ करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते आणि त्यांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीच आता हे ‘ऑडिट’ करण्याचे काम करावे, अशीही अपेक्षा वसई-विरारकर करीत आहेत. विजय वल्लभ रुग्णालय आगीच्या दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीत अग्निशमन विभागाचा रामभरोसे कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गंभीर म्हणजे अग्निशमन विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची सपशेल पायमल्ली केली असून, कोविड रुग्णालयांना कसलीही शहानिशा न करताच वातानुकूलित कक्षात बसवून नाहरकत दाखले देण्यात आल्याची धक्कादायक माहिती विजय वल्लभ रुग्णालयाच्या आगीच्या घटनेमुळे समोर आली  आहे.

दरम्यान, दिनांक २३ एप्रिलला शुक्रवारी विरारच्या विजय वल्लभ या खासगी कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून १५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रुग्णालय व्यवस्थापनावर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. आता या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी मीरा - भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या चौकशीमध्ये पालिकेच्या अग्निशमन विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालिकेने अग्निसुरक्षेच्या किती नोटीस पाठवल्या?

nआग दुर्घटनेसाठी कोण जबाबदार आहे, ते गुन्हे शाखेतर्फे निश्‍चित केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये निर्णय देताना दरमहा सर्व कोविड रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, वसई - विरार शहर महापलिकेचा अग्निशमन विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एखाद्या कायद्याप्रमाणे असतो. nपालिकेला अशा आदेशाबद्दल काहीच माहिती नसल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेने शहरातील किती आस्थापनांना अग्निसुरक्षेच्या नोटीस पाठवल्या? रुग्णालय आणि इतर आस्थापनांनी अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केले नसेल तर अग्निशमन विभागाने त्यांच्यावर कारवाई का केली नाही? याचीही चौकशी तपासात पालिकेकडे केली जाणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर