शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

वीजबिल वसुलीसाठी प्रबाेधनातून साद; वरिष्ठ अधिकारी फिल्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 2:06 AM

सुटी दिवशीही भरणा केंद्र सुरू, शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी अभियान

नालासोपारा : महावितरणच्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमांद्वारे जागृती केली जात आहे.घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह सरकारी आस्थापनांकडून मार्चमध्ये सुमारे २९० कोटींचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीज बिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरू आहे. 

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, क्षेत्रीय अभियंते, अधिकारी, जनमित्र मोहिमेत सहभागी झाले आहेत. ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ ही संकल्पना रुजवून ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी वसई, विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे भागात रॅली, ग्राहक संवाद असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत आणखी १०७ कोटींच्या वीजबिलाची वसुली आवश्यक आहे. यात पाच हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे जवळपास ५९ हजार ग्राहक असून त्यांच्याकडे १०७ कोटींची थकबाकी आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. मार्चमध्ये आतापर्यंत वसई मंडलातील दाेन लाख ७७ हजार लघुदाब ग्राहकांनी १०४ कोटींचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ऑनलाइन वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वसई मंडलात ५.१२ काेटींची थकबाकीमहाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत कृषिपंप ग्राहकांचे मेळावे, संपर्क अभियान व प्रबोधन, थकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम मंडळात राबवण्यात येत आहेत. वसई मंडलात एकूण पाच हजार २६६ कृषिपंप ग्राहक आहेत. त्यांच्याकडे पाच कोटी १२ लाखांची थकबाकी आहे. योजनेतील तरतुदीमुळे ही थकबाकी चार कोटी १६ लाखांपर्यंत कमी झाली आहे. चालू बिलासह दाेन कोटी आठ लाखांचा भरणा केल्यास मंडलातील सर्व शेतकरी थकबाकीमुक्त होतील. थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्याची ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. आतापर्यंत १४१४ कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिलाचे ६० लाख भरून सहकार्य केले आहे.

विक्रमगड : महावितरण कंपनीने विक्रमगड तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांकडून सक्तीने वीजबिल वसुलीला सुरुवात केली आहे. वीजबिल भरणा केला नाही, तर वीज कनेक्शन तोडले जात आहे. हे अन्यायकारक असून या थकीत बिलांना महावितरण जबाबदार आहे. थकीत वीजबिलधारकांचे वीज कनेक्शन तोडू नका, असा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव काॅ. किरण गहला यांनी दिला आहे. आदिवासी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असून, मोठ्या प्रमाणात आलेली वीजबिले कशी भरणार? यासाठी सक्ती नको. हे वीज कंपनीने थांबविले नाही, तर   माकप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा गहला यांनी दिला आहे.